आपले सानुकूल नकाशे तयार करा आणि संपादित करा

आपण Google माझे नकाशे सह ऑनलाइन शेअर करण्यासाठी सानुकूल नकाशे तयार करू शकता. उदाहरणार्थ, कुत्र्यांसाठी अनुकूल सर्वोत्तम हायकिंग ट्रेलचा मागोवा घेण्यासाठी किंवा आपला व्यवसाय विस्तारण्याकरिता नवीन स्थाने जतन करण्यासाठी नकाशा तयार करा.

नवीन नकाशा तयार करा

  1. नकाशाच्या शीर्षस्थानी उजव्या कोपऱ्यातील साइन इन बटण वापरून Google नकाशे मध्ये साइन इन करा.
  2. शोध बॉक्स रिकामा असल्याची खात्री करा नंतर त्यामध्ये क्लिक करा.
  3. माझे नकाशे क्लिक करा.
  4. तयार करा बटण क्लिक करा.

आपला नकाशा सानुकूल करा

आपल्या नकाशामध्ये स्थाने जोडा

स्थान जोडण्यासाठी आपण हे करू शकता:

  • पिन बटण क्लिक करा Add markerनंतर नकाशावर कुठेही क्लिक करा किंवा
  • स्थान शोधा, नकाशावरील हिरव्या पिनवर क्लिक करा, नंतर नकाशात जोडा क्लिक करा.

आपला नकाशा सानुकूल कसा करायचा याविषयी अधिक जाणून घ्या.

आपल्या नकाशात रेषा आणि आकार जोडा

आपल्या नकाशावर हायकिंग मार्गाचा मागोवा घेण्यासाठी फक्त एक रेषा काढा. Draw a line or shapeटूलबारमधील रेषा बटण क्लिक करा. आपल्या रेषेच्या प्रत्येक बिंदूवर क्लिक करा. रेखांकन संपविण्यासाठी शेवटच्या बिंदूवर दोनदा क्लिक करा.

आपल्याला राहायला आवडेल अशा परिसराभोवती रेखांकन करण्यासाठी आपण एक आकार रेखाटू शकता. Draw a line or shapeटूलबारमधील आकार बटण क्लिक करा. आपल्या आकाराच्या प्रत्येक बिंदूवर क्लिक करा. रेखांकन संपविण्यासाठी सुरुवातीच्या बिंदूवर दोनदा क्लिक करा.

आपला नकाशा सानुकूल कसा करायचा याविषयी अधिक जाणून घ्या.


थेट माझे नकाशे वर जा

माझे नकाशे पहा, संपादित करा आणि व्यवस्थापित करा

अस्तित्वातील माझा नकाशा उघडा

अापण माझे नकाशे मध्ये नकाशे तयार केल्यास आपण Google नकाशे मध्ये आपले 5 सर्वात अलीकडील नकाशे पाहू शकता.

  1. नकाशाच्या शीर्षस्थानी उजव्या कोपऱ्यातील साइन इन बटण वापरून Google नकाशे मध्ये साइन इन करा.
  2. शोध बॉक्स रिकामा असल्याची खात्री करा नंतर त्यामध्ये क्लिक करा.
  3. आपण नुकत्याच तयार केलेल्या नकाशांची सूची पाहण्यासाठी माझे नकाशे क्लिक करा.
  4. सूचीतील एका नकाशावर क्लिक करा (किंवा आपले सर्व नकाशे पहा क्लिक करा).
  5. आपण उघडलेला नकाशा संपादित करण्यासाठी मूळ नकाशा उघडा क्लिक करा.
आपला नकाशा हटवा

अस्तित्वातील नकाशा उघडण्यासाठी वरील सूचना वाचा. नंतर आपला नकाशा हटवण्यासाठी नकाशा मेनू चिन्हावर क्लिक करा, नंतर हा नकाशा हटवा क्लिक करा.

आपली स्थाने पहा

आपण नकाशावर "माझी स्थाने" पाहू शकता जसे की आपण जतन केलेली स्थाने, रेटिंग, चेक-इन आणि आपण शोधलेली स्थाने.

  1. Google नकाशे उघडा.
  2. नकाशाच्या शीर्षस्थानी, साइन इन बटण वापरुन आपल्या Google खात्यात साइन इन करा. आपल्याला साइन इन बटण दिसत नसल्यास आपण आधीच साइन इन केलेले असू शकते.
  3. आपण जतन केलेली स्थाने नकाशावर पिवळे तारे म्हणुन दिसतात. इतर स्थानांना पिवळ्या रंगात ठळक केलेली विशेष चिन्हके आहेत.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18378415746676759525
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false