Google च्या स्थान सेवांमध्ये ॲक्सेस पॉइंटचा समावेश नियंत्रित करणे

स्थान सेवांमध्ये सुधारणा करणे आणि डिव्हाइसच्या स्थानाचा अंदाज घेणे यांसाठी, Google हे वायरलेस ॲक्सेस पॉइंट आणि GPS, सेल टॉवर तसेच सेन्सर डेटा यांवरून सार्वजनिकरीत्या ब्रॉडकास्ट केली जाणारी वाय-फाय माहिती वापरते. हा डेटा खुद्द वायरलेस ॲक्सेस पॉइंटच्या स्थानासह, त्याबद्दलच्या माहितीपुरता मर्यादित असतो.

Google Maps यांसारख्या ॲप्सना आणखी चांगले काम करण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही Google स्थान सेवांना तुमचा वाय-फाय ॲक्सेस पॉइंट वापरू देऊ शकता. 

Google स्थान सेवांमधून मी माझ्या ॲक्सेस पॉइंटची निवड कशी रद्द करायची?

निवड रद्द करण्यासाठी, तुमच्या वाय-फाय ॲक्सेस पॉइंटचा (तुमच्या वायरलेस नेटवर्कचे नाव) SSID (नाव) बदला जेणेकरून, त्याच्या शेवटी "_nomap" असेल. उदाहरणार्थ, तुमचा SSID "12345" असल्यास, तुम्ही तो "12345_nomap" असा बदलाल.

तुमच्या ॲक्सेस पॉइंटसाठी विशिष्ट पायऱ्या शोधणे

तुमचा अ‍ॅक्सेस पॉइंट तुम्हाला तुमच्या ISP कडून मिळाला असल्यास, पायर्‍यांसाठी तुमच्या ISP शी संपर्क साधा. अन्यथा, तुमच्या ॲक्सेस पॉइंटच्या उत्पादकाची वेबसाइट तपासा:

अनेक ॲक्सेस पॉइंटसाठी सर्वसाधारण पायऱ्या फॉलो करा

  1. तुमचा ॲक्सेस पॉइंट आणि तुमचा काँप्युटर यांच्या दरम्यान इथरनेटने प्रत्यक्ष कनेक्शन तयार करा.
  2. तुमच्या कनेक्शनचा डीफॉल्ट गेटवे शोधा:
    • Windows वर, कमांड सूचनेमध्ये (स्टार्ट मेनू वर) "ipconfig" टाइप करा.
    • Mac OS वर, कमांड सूचनेमध्ये "ifconfig" टाइप करा.
    • Linux वर, कमांड सूचनेमध्ये "ifconfig" टाइप करा.
  3. तुम्हाला डीफॉल्ट गेटवे (तो 192.168.0.1 असा दिसतो) मिळाल्यानंतर, तो तुमच्या Chrome किंवा Firefox यांसारख्या वेब ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये टाइप करा. ही पायरी तुम्हाला तुमच्या ॲक्सेस पॉइंटसाठी कंट्रोल पॅनलवर नेईल.
  4. तुमच्या ॲक्सेस पॉइंटच्या कंट्रोलमध्ये साइन इन करण्यास सांगितले गेल्यास, योग्य वापरकर्ता नाव आणि पासवर्ड एंटर करा. तुमच्या ॲक्सेस पॉइंटसोबत आलेल्या सूचना पहा.

तुम्ही तुमचा SSID बदलल्यानंतर, त्याचे नवीन नाव वापरून नेटवर्कशी पुन्हा कनेक्शन स्थापित करा. तुमचा लॅपटॉप किंवा मोबाइल फोन यांसारख्या वाय-फाय वापरणाऱ्या कोणत्याही डिव्हाइसवरून तुम्ही ही कृती करू शकता. तुमचे नेटवर्क पासवर्डने सुरक्षित केलेले असल्यास, तोच पासवर्ड वापरा.

Google कडे तुमचा बदललेला SSID झटपट सबमिट केला जाईल याची खात्री करण्यासाठी, वाय-फाय सुरू केलेल्या Android डिव्हाइसवर Google Maps उघडा. तुमच्या वाय-फाय ॲक्सेस पॉइंटजवळ स्थान निश्चिती स्थापित करण्यासाठी, माझे स्थान माझे स्थान वर टॅप करा.

माझा ॲक्सेस पॉइंट इतर स्थान सेवांवरून काढून टाकला जाईल का?

प्रत्येक स्थान सेवा पुरवठादार स्वतंत्रपणे ऑपरेट करतो. इतर पुरवठादार निवड रद्द करण्याची SSID पद्धत पाहू शकतात. स्थान सर्व्हरमध्ये समावेश केला जाण्याची निवड रद्द करण्याचा मार्ग म्हणून "_nomap" टॅगचा आदर करण्यासाठी आम्ही इतर पुरवठादारांना प्रोत्साहन देतो.

क्लिष्ट पासवर्ड एंक्रिप्शन वापरून मी माझे वायरलेस नेटवर्क कसे सुरक्षित करायचे?

Google च्या स्थान सेवांवरून तुमचा ॲक्सेस पॉइंट काढून टाकणे यापेक्षा वेगळे, क्लिष्ट पासवर्ड एंक्रिप्शन वापरून तुमचे वायरलेस नेटवर्क कसे सुरक्षित करायचे याबाबत तुम्हाला Google सुरक्षा केंद्र येथे टिपा सापडू शकतात.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10231041256639344608
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false