दिशानिर्देश मिळवणे आणि मार्ग दाखवणे

तुम्ही Google Maps वर ड्रायव्हिंग, सार्वजनिक परिवहन, चालणे, राइड शेअरिंग, सायकलिंग, फ्लाइट किंवा मोटरसायकलसाठी दिशानिर्देश मिळवू शकता. एकाहून अधिक मार्ग असल्यास, तुमच्या गंतव्यस्थानाचा सर्वोत्कृष्ट मार्ग निळ्या रंगात आणि इतर मार्ग राखाडी रंगात दाखवलेले असतील. Google Maps मधील काही दिशानिर्देश हे डेव्हलप केले जात असून त्यांची उपलब्धता मर्यादित असू शकते. 

महत्त्वाचे: तुम्ही Google Maps वर दिशानिर्देश वापरताना सतर्क रहा. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी नेहमीच तुमच्या आजूबाजूला लक्ष ठेवा. शंका असल्यास, रहदारीचे वास्तविक नियम फॉलो करा आणि तुम्ही ज्या रस्त्यावर आहात तेथील चिन्हे कंफर्म करा.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. दिशानिर्देश Directions वर क्लिक करा.
  3. नकाशावरील पॉइंटवर क्लिक करा, पत्ता टाइप करा किंवा ठिकाणाचे नाव जोडा.
  4. तुमचा वाहतुकीचा मोड निवडा.

टीप: कोणत्याही वाहतूक मोडमध्ये दुसरा मार्ग निवडण्यासाठी, तो नकाशावर निवडा. प्रत्येक मार्ग नकाशामध्ये प्रवासाची अंदाजे वेळ दाखवतो.

Google Maps वाहतूकीचे मोड

तुम्ही Google Maps मध्ये वाहतुकीच्या विविध मोडसाठी दिशानिर्देश मिळवू शकता. प्रत्येक मोडमधील वैशिष्ट्ये आणि उपलब्धतेमधील फरकांबद्दल जाणून घ्या:

ड्रायव्हिंग: Driving

  • ड्राइव्हिंग Driving मार्ग कारच्या वापरासाठी डिझाइन करण्यात आले आहेत आणि ते फक्त कारसाठी असलेल्या रस्त्यांवर नेव्हिगेट करू शकतात. मोटर असलेल्या सायकल किंवा १२५cc च्या आतील मोटारसायकल चालवताना, “टोल आणि महामार्ग टाळा” हा मार्ग पर्याय वापरा.
  • तुम्हाला ड्रायव्हिंग मार्ग बदलायचा असल्यास, मार्गावरील स्पॉटवर क्लिक करा आणि धरून ठेवा व ते नकाशावरील नवीन स्पॉटवर ड्रॅग करा.

परिवहन: Transit

  • Google Maps मध्ये सर्व शहरांमध्ये सार्वजनिक परिवहनाशी संबंधित दिशानिर्देश दाखवले जात नाहीत. तुम्हाला परिवहन दिशानिर्देश मिळण्यापूर्वी तुमच्या स्थानिक परिवहन एजन्सीने त्यांच्या मार्गाची माहिती Google Maps मध्ये जोडण्याची आवश्यकता आहे.

पायी: Walking

राइड: Ride services

सायकलिंग: Cycling

  • तुम्ही तुमची सायकल चालवता, तेव्हा तुमच्या देशामध्ये/प्रदेशामध्ये उपलब्ध असल्यास, सायकलिंगचे Cycling मार्ग वापरू शकता.

फ्लाइट: Flight

एकाहून अधिक गंतव्यस्थाने जोडा

तुम्ही सार्वजनिक परिवहन किंवा फ्लाइट वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी एकाहून अधिक गंतव्यस्थानांसाठी दिशानिर्देश मिळवू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. दिशानिर्देश Directions वर क्लिक करा.
  3. सुरुवातीचे ठिकाण आणि गंतव्यस्थान जोडा
  4. डावीकडे, तुम्ही एंटर केलेल्या गंतव्यस्थानांच्या खाली, जोडा Add वर क्लिक करा.
  5. थांबा जोडण्यासाठी, दुसरे गंतव्यस्थान निवडा.
    • तुम्ही कमाल नऊ थांबे जोडू शकता.
  6. दिशानिर्देश मिळवण्यासाठी मार्गावर क्लिक करा.

टीप: तुम्ही तुमच्या मार्गावरील ठिकाणे शोधू शकता.

तुमच्या थांब्यांचा क्रम बदलण्यासाठी: 

  1. तुम्हाला हलवायचे असलेले गंतव्यस्थान शोधा. 
  2. गंतव्यस्थान ड्रॅग करा.

मार्ग दृश्य मध्ये दिशानिर्देशांचे पूर्वावलोकन करणे

महत्त्वाचे: मार्ग दृश्य मध्ये दिशानिर्देश मिळवण्यासाठी, दिशानिर्देश Directions वर क्लिक करा. त्यानंतर, सुरुवातीची आणि अंतिम गंतव्यस्थाने एंटर करा.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, तुम्हाला हव्या असलेल्या मार्गाच्या खाली तपशील वर क्लिक करा.
  2. अधिक तपशीलवार दिशानिर्देश मिळवण्यासाठी, विस्तार करा विस्तार करा वर क्लिक करा.
  3. दिशानिर्देशांमधील एखाद्या पायरीकडे पॉइंट करा. मार्ग दृश्य उपलब्ध असल्यास, तुम्हाला पूर्वावलोकन दाखवणारा फोटो दिसेल.
  4. तुम्हाला हव्या असलेल्या पायरीसाठी मार्ग दृश्य मिळवण्याकरिता, फोटोवर क्लिक करा.
    • मार्गामधील इतर पायऱ्यांसाठी मार्ग दृश्य मिळवण्याकरिता, तळाशी डावीकडे असलेल्या चौकटीत, मागील पायरी किंवा पुढील पायरी वर क्लिक करा.
    • पूर्वावलोकनामधून बाहेर पडण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, बंद करा बंद करा वर क्लिक करा.

तुमचा मार्ग कस्टमाइझ करा

टोल किंवा महामार्ग टाळा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. दिशानिर्देश Directions वर क्लिक करा.
  3. नकाशावरील पॉइंटवर क्लिक करा, पत्ता टाइप करा किंवा ठिकाणाचे नाव जोडा.
  4. पर्याय निवडा.
  5. "टोल" किंवा "महामार्ग" यांच्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा.
तुमची निघण्याची किंवा पोहचण्याची वेळ बदला
अंदाजे वाहतूक आणि परिवहनाचे शेड्युल यांच्या आधारे तुम्ही सर्वोत्तम मार्ग शोधण्यासाठी तुमची प्रवासाची तारीख किंवा वेळ बदलू शकता. याचा फक्त एक गंतव्यस्थान असलेल्या मार्गांसाठी उपयोग होतो.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. दिशानिर्देश मिळवा.
  3. तुम्हाला तुमचे दिशानिर्देश मिळाल्यानंतर, आता निघा वर क्लिक करा.
  4. तुमच्या प्रवासाच्या तारखा किंवा वेळा बदलण्यासाठी, या वेळी निघा किंवा या वेळी पोहोचा निवडा.
परिवहनाचे पर्याय आम्ही कसे रँक करतो ते समजून घ्या

तुम्ही Google Maps मध्ये गंतव्यस्थान एंटर करता, तेव्हा ड्राइव्ह करत, सायकल चालवत किंवा चालत यांसारख्या प्रवासाच्या वेगवेगळ्या मोडनी तिथे कसे पोहोचावे ते आम्ही दाखवतो. 

कधीकधी, आम्ही तुम्हाला दाखवत असलेले वाहतुकीचे पर्याय हे संबंधित आणि उपयुक्त माहिती शोधून देण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेल्या वस्तुनिष्ठ घटकांच्या काॅंबिनेशननुसार रँक केले जातात. या घटकांमध्ये कालावधी, किंमत, अंतर, तुमचा प्राधान्य दिलेला मोड किंवा तुमच्या क्वेरीशी संबंधित मोडची उपयुक्तता यांचा समावेश असतो. साधारणतः, तुमचा प्राधान्य दिलेला मोड, प्रवासाचे कालावधी आणि कधीकधी किंमत हे सर्वात महत्त्वाचे घटक असतात.

उपलब्ध असते तिथे, आम्ही सार्वजनिक परिवहन, स्कूटर किंवा सायकल रेंटल आणि वाहनाशी संबंधित राइड सेवा यांसारख्या इतर मोबिलिटी सेवादेखील तुम्हाला दाखवतो. या मोबिलिटी सेवा अशा तृतीय पक्षांद्वारे पुरवल्या जातात, ज्यांनी त्यांचा डेटा सार्वजनिकपणे उपलब्ध केला आहे किंवा आमच्यासोबत भागीदारीचा करारनामा केला आहे. कोणत्याही परिवहन सेवा पुरवठादारांसोबत असलेल्या आमच्या कोणत्याही भागीदारी किंवा व्यावसायिक संबंधांचा या सेवांच्या रँकिंगवर परिणाम होत नाही.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1061359542184015382
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false