प्रतिबंधित आणि मर्यादित आशय

पुढील धोरणे ही परीक्षणे, फोटो आणि व्हिडिओच्या समावेशासह सर्व फॉरमॅटवर लागू होतात. या निकषांची पूर्तता न करणारा आशय Google Maps वरील प्रकाशनासाठी नाकारला जाऊ शकतो.

Google Maps मधील योगदानांनी विवादात असलेल्या स्थानाचे अचूकपणे प्रतिनिधित्व केले पाहिजे. योगदानांनी सत्याचा विपर्यास केल्यावर, आम्ही आशय काढून टाकू. यामध्ये अशा परीक्षणांचा, फोटोचा किंवा व्हिडिओचा समावेश आहे, जे टॅग केलेल्या स्थानाशी किंवा व्यवसायाशी संबंधित नाहीत. नकाशावर आशय चुकीच्या पद्धतीने ठेवलेला असल्यास किंवा चुकीच्या सूचीसंबंधित असल्यास, योगदान नाकारले जाऊ शकते.

बनावट परीक्षणे आणि स्पॅम यांसारखा अयोग्य आशय डिटेक्ट करण्यासाठी परीक्षणांवर आपोआप प्रक्रिया केली जाते. आम्ही Google च्या धोरणांचे किंवा कायदेशीर दायित्वांचे पालन करण्यासाठी फ्लॅग केलेली परीक्षणे काढून टाकू शकतो.

नागरी चर्चा

छळ

आम्ही वापरकर्त्यांना इतर लोकांचा किंवा व्यवसायांचा छळकरण्यासाठी अथवा इतरांना छळणुकीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता आशय पोस्ट करण्याची अनुमती देत नाही.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 

  • व्यक्ती किंवा लोकांच्या विशिष्ट गटांना इजा पोहोचवण्याची धमकी असणारा आशय, ज्यामुळे सुजाण व्यक्तीला त्याच्या मानसिक अथवा शारीरिक सुरक्षिततेबद्दल किंवा स्वास्थ्याबद्दल भीती वाटेल.
  • डॉक्सिंग.
  • लैंगिक कृत्ये, लैंगिक कल किंवा लिंगाधारित ओळख यांबद्दलच्या दाव्यांसह एखाद्या व्यक्तीला अनावश्यकरीत्या लैंगिक पद्धतीने किंवा एक वस्तू म्हणून सादर करणारा आशय. 
द्वेषयुक्त भाषण

Google Maps उत्पादने ही वापरकर्त्यांना त्यांच्या सभोवतालचे जग नेव्हिगेट आणि एक्सप्लोर करण्यासाठी मदत करण्याकरिता डिझाइन केलेली आहेत. Google येथे, आमचा विश्वास आहे, की वंश, वांशिकता, धर्म, भिन्नक्षमता, वय, राष्ट्रीयत्व, माजी सैनिक स्टेटस, लैंगिक अभिमुखता, लिंग, लिंगाधारित ओळख, जात किंवा इतर कोणतेही संरक्षित स्टेटस असले, तरीही द्वेषयुक्त भाषण याचे बळी न होता सर्व लोकांना माहिती अ‍ॅक्सेस करण्याचा आणि तिची देवाणघेवाण करण्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे.

कोणत्याही प्रकारच्या द्वेषयुक्त भाषणाचा समावेश असलेला आशय पोस्ट किंवा शेअर करू नका.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 

  • संरक्षित व्यक्ती किंवा गटांविरुद्ध हिंसाचार करण्यासाठी थेट आवाहन करणे.
     
  • अमानवीय, कमी लेखणारा किंवा संरक्षित वैशिष्ट्याच्या आधारे व्यक्ती अथवा गटांना अपमानित करणारा आशय. 

आम्ही सकारात्मक पद्धतीने संरक्षित व्यक्ती किंवा गटासंबंधित संदर्भाचा समावेश असलेल्या आशयाला अनुमती देतो.

आक्षेपार्ह आशय

वापरकर्त्यांमध्ये मतभेद असला, तरीही Google Maps हे आदरयुक्त स्थान असले पाहिजे. म्हणूनच, आम्ही वापरकर्त्यांना आक्षेपार्ह आशय पोस्ट करण्याची अनुमती देत नाही.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 

  • इतर व्यक्तींवर किंवा गटांवर हल्ला करण्यासाठी Google उत्पादने वापरणे. 
  • स्पष्टपणे आणि जाणूनबुजून चिथावणी देणारा आशय. 
  • अनैतिक वर्तणूक किंवा गुन्हेगारी अपराधाचे कोणताही आधार नसलेले आरोप. 

नकारात्मक अनुभवांचे आदरपूर्वक वर्णन करणाऱ्या आशयाला आम्ही अनुमती देतो.

वैयक्तिक माहिती

संमतीशिवाय वैयक्तिक माहिती वितरित किंवा पोस्ट करू नये.  एखाद्या जिवंत, ओळखण्यायोग्य व्यक्तीला लागू होणारी माहिती म्हणजे वैयक्तिक माहिती आणि ती धोक्यात आल्यास किंवा तिचा गैरवापर केला गेल्यास हानी होण्याची शक्यता असते. यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 

  • दुसर्‍याच्या संमतीशिवाय पोस्ट केलेली वैयक्तिक माहिती, जसे की: पूर्ण नाव/आडनाव, फोटो किंवा व्हिडिओमधील त्यांचा चेहरा अथवा संमतीशिवाय पोस्ट केल्याची नोंद केलेली इतर माहिती यांचा समावेश असलेला आशय. 
  • वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहिती आणि आर्थिक माहिती, वैद्यकीय माहिती किंवा वैयक्तिक ओळख माहितीसह स्वतःबद्दल अथवा इतरांबद्दलची इतर वैयक्तिक माहिती. 

आम्ही व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित फोन, ईमेल किंवा सोशल मीडिया हँडलसह संपर्क माहिती पोस्ट करण्याची अनुमती देतो.

एखाद्या व्यक्तीचे नाव सामान्यपणे प्रचलित किंवा जाहिरात केलेल्या व्यवसाय संस्थेचा भाग असल्यास किंवा ते त्यांच्या नावाखाली सार्वजनिक व्यवसाय करणारे व्यावसायिक असल्यास, आम्ही त्याच्या संपूर्ण नावालादेखील अनुमती देतो. 

तुमची वैयक्तिक माहिती ही तुमच्या संमतीशिवाय पोस्ट केली गेली आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया पुनरावलोकन फ्लॅग करण्यासाठी या सूचना फॉलो करणे हे करा.

फसवा आशय

फसवी समरसता

Google Maps मधील योगदाने एखाद्या ठिकाणावरील किंवा व्यवसायासंबंधित वास्तविक अनुभव दर्शवणारी असावीत. फसवी समरसता याला अनुमती नाही आणि ती काढून टाकली जाईल. 

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • खऱ्या अनुभवाचे प्रतिनिधित्व करत नसलेला आशय पोस्ट करण्यासाठी पैसे देणे, लाभ देणे किंवा प्रोत्साहन देणे.
  • नकारात्मक परीक्षणांना परावृत्त करणे किंवा प्रतिबंधित करणे अथवा ग्राहकांकडून निवडकपणे सकारात्मक परीक्षणे मिळवणे.
  • वास्तविक अनुभवावर आधारित नसलेला आणि संबंधित स्थानाचे किंवा उत्पादनाचे अचूक प्रतिनिधित्व न करणारा आशय. 
  • सवलती, विनामूल्य वस्तू आणि/किंवा सेवांच्या बदल्यात व्यवसायाद्वारे प्रोत्साहन दिलेला आशय.
    ऑफर केलेल्या सवलती, विनामूल्य वस्तू किंवा सेवा अथवा इतर प्रोत्साहनांद्वारे नकारात्मक परीक्षणामध्ये सुधारणा करण्याच्या किंवा ते काढून टाकण्याच्या व्यापाऱ्याच्या विनंत्यांचा यामध्ये समावेश आहे.
  • व्यवसाय किंवा उत्पादनाची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी प्रतिस्पर्ध्याने पोस्ट केलेला आशय.
  • ठिकाणाच्या रेटिंगमध्ये फेरफार करण्यासाठी एकाहून अधिक खात्यांमधून पोस्ट केलेला आशय.
  • वास्तविक प्रतिबद्धतेची नक्कल करण्यासाठी, सेन्सर डेटा किंवा परिणामांमध्ये फेरफार करण्यासाठी अथवा नेहमीच्या कामकाजामध्ये अडथळा किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी एम्यूलेशन अथवा डिव्हाइसमध्ये फेरबदल करणाऱ्या इतर सेवा, बदललेली ऑपरेटिंग सिस्टीम किंवा इतर पद्धती वापरून पोस्ट केलेला आशय.
तोतयेगिरी

इतरांची दिशाभूल करण्यासाठी Google Maps वापरणे हे वापरकर्त्यांना त्यांच्या सभोवतालचे जग एक्सप्लोर करताना मदत करण्यासाठी उपयुक्त माहिती पुरवण्याच्या उद्देशाला अनुसरून नाही. कोणत्याही व्यक्ती, गट किंवा संस्थेची तोतयेगिरी करण्यासाठी Google Maps वापरू नका. 

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 

  • कोणत्याही व्यक्ती, गट किंवा संस्थेची तोतयेगिरी करण्यासाठी पोस्ट किंवा शेअर केलेला आशय.
  • पडताळणी केलेला अधिकृत स्रोत असल्याचे भासवत असलेला आशय.

व्‍यक्‍ती किंवा संस्‍थेची पर्यायी नावे असणाऱ्या, पण इतरांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न न करणाऱ्या आशयाला आम्ही अनुमती देतो.

चुकीची माहिती

खोट्या, चुकीच्या किंवा फसव्या माहितीमुळे व्यक्ती, व्यवसाय आणि समाजाला गंभीर हानी पोहोचू शकते. म्हणूनच, आम्ही वापरकर्त्यांना चुकीची माहिती पोस्ट करण्याची अनुमती देत नाही.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 

  • फसवी किंवा दिशाभूल करणारी आरोग्यविषयक अथवा वैद्यकीय माहिती असलेला हानिकारक आशय.
  • नागरी प्रक्रियांबद्दल फसवी किंवा दिशाभूल करणारी माहिती असलेला हानिकारक आशय.
  • वापरकर्त्यांना फसवण्यासाठी किंवा त्यांची दिशाभूल करण्यासाठी फेरफार करण्यात आलेले दखल घेण्यायोग्य इव्हेंट किंवा नागरी चर्चेसंबंधित हानिकारक आशय.

आम्ही पडताळणीयोग्य अधिकृत स्रोतांकडील आशयाला अनुमती देतो.

दिशाभूल

दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे Google Maps वरील माहितीच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, इतरांना चुकीची माहिती देण्यासाठी किंवा त्यांना फसवण्यासाठी अथवा दिशाभूल करण्यासाठी आम्ही व्यक्तींना Google Maps वापरण्याची अनुमती देत नाही.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • वस्तू किंवा सेवेच्या गुणवत्तेचे खोटे किंवा दिशाभूल करणारे वर्णन करणे. 
  • इतर वापरकर्त्यांना फसवण्यासाठी सत्याचा विपर्यास करणे किंवा ते वगळणे.
  • वापरकर्त्याच्या निर्णय प्रक्रियेवर अवाजवी प्रभाव टाकू शकणाऱ्या माहितीचा विपर्यास करणे किंवा ती वगळणे.
  • हितसंबंधातील परस्परविरोधावर आधारित असलेला आशय.
  • वापरकर्त्यांना गोपनीय माहिती उघड करण्यासाठी, नको असलेले किंवा दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी अथवा त्यांना फिशिंग किंवा आमिषाला बळी पाडण्यासाठी आशय पोस्ट करणे.

प्रौढ आशय

अश्लीलता आणि असभ्य भाषा

आम्ही Google Maps वरील अश्लील आणि असभ्य भाषा असलेला आशयकाढून टाकू.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • इतर वापरकर्त्यांचा अपमान करण्यासाठी किंवा टीका करण्यावर भर देण्यासाठी असभ्य भाषा किंवा अश्लीलता वापरणारा आशय.

आम्ही इतर संदर्भांमध्ये कदाचित असभ्य भाषा मानल्या जाणार्‍या शब्दांच्या आक्षेपार्ह नसलेल्या वापरास अनुमती देतो.

लैंगिकदृष्ट्या भडक आशय

Google Maps हे आपल्या सभोवतालचे जग सुरक्षितरीत्या एक्सप्लोर करण्याचे ठिकाण आहे. म्हणूनच, आम्ही लैंगिकदृष्ट्या भडक आशय याला अनुमती देत नाही.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 

  • पोर्नोग्राफी किंवा लैंगिक आनंद देण्याच्या हेतूने लैंगिक कृत्ये, गुप्तांग किंवा कामुकतेचे सादरीकरण.
  • नग्न जननेंद्रियाचा समावेश असलेला आशय.
  • पशुसंभोगाचे उदात्तीकरण करणारा किंवा त्याला प्रोत्साहन देणारा आशय.
  • लैंगिकदृष्ट्या भडक आशयाचे किंवा वर्तनाचे उदात्तीकरण करणारा अथवा त्याला प्रोत्साहन देणारा आशय.

आशय हा आवडत्या ठिकाणासंबंधित असल्यास आणि त्यामध्ये वापरकर्त्यांना संदर्भ समजण्यासाठी पुरेशी माहिती दिलेली असल्यास, आम्ही शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक हेतूसाठी लैंगिकदृष्ट्या भडक आशयाला अनुमती देऊ शकतो.

प्रौढ थीम असलेला आशय

Google Maps हे वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आणि योग्य माहिती शोधण्याचे ठिकाण आहे. म्हणूनच, आम्ही प्रौढ थीम असलेला आशय याला अनुमती देत नाही.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • भडक नसलेली पोर्नोग्राफी किंवा लैंगिक आनंद देण्याचा हेतू असलेला कोणताही आशय.
  • निर्जीव वस्तूंना कामुक पद्धतीने दाखवणारा कोणताही आशय.
  • स्पष्टपणे लैंगिकरीत्या सूचक पोझ, ज्यामध्ये संबंधित गोष्ट नग्न, ब्लर किंवा अपुरे कपडे घातलेली आहे.
  • सेक्स टॉयसंबंधित अव्यावसायिक आशय. 

आशय हा आवडत्या ठिकाणासंबंधित असल्यास आणि त्यामध्ये वापरकर्त्यांना संदर्भ समजण्यासाठी पुरेशी माहिती दिलेली असल्यास, आम्ही शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक हेतूसाठी प्रौढ थीम असलेल्या आशयाला अनुमती देऊ शकतो.

आम्‍ही अपुरे कपडे घातलेल्‍या व्‍यक्‍तींच्या लैंगिक नसलेल्या सादरीकरणाला परवानगी देऊ शकतो.

हिंसा आणि रक्तपात

Google Maps वर, आम्ही देत असलेल्या माहितीमुळे आमचे उत्पादन वापरणार्‍यांना सकारात्मक अनुभव मिळत असल्याची खात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणूनच आम्ही लोकांचा किंवा प्राण्यांचा समावेश असलेला हिंसक अथवा रक्तरंजित आशय याला अनुमती देत नाही. 

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • लोकांचा किंवा प्राण्यांचा धक्कादायक, खळबळजनक किंवा अहेतूक समावेश असलेला हिंसक किंवा रक्तरंजित आशय.
  • भरपूर प्रमाणात रक्त, गंभीर इजा अथवा प्राण्यांचा किंवा लोकांचा मृत्यू यांचा समावेश असलेली ग्राफिक स्वरूपातील हिंसा.
  • प्राण्यांसंबंधित क्रूरतेचा समावेश असलेला आशय.

विनियमित, धोकादायक आणि बेकायदेशीर 

प्रतिबंधित आशय

नियंत्रणे आणि स्थानिक नियमांच्या अधीन असलेल्या काही उत्पादनांसाठी किंवा सेवांसाठी, आशय पोस्ट करताना तुम्ही काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. तुम्ही अपलोड करत असलेल्या आशयामध्ये स्थानिक कायदेशीर नियमांच्या अधीन असलेल्या उत्पादनांच्या किंवा सेवांच्या विक्रीसाठी केलेल्या आवाहनाचा अथवा ऑफरचा समावेश नसावा. यामध्ये अल्कोहोल, जुगार, तंबाखू, बंदुका, आरोग्यविषयक आणि वैद्यकीय उपकरणे, नियमन केलेली औषधे, प्रौढ व्यक्तींसंबंधित सेवा आणि वित्तसंबंधित सेवा यांचा समावेश आहे, पण त्यापुरताच मर्यादित नाही.

आशयामध्ये पुढील गोष्टी दाखवू नये:

  • प्रतिबंधित वस्तू किंवा सेवा खरेदी करणे शक्य असलेल्या लॅंडिंग पेजच्या लिंक.
  • प्रतिबंधित वस्तूंच्या खरेदीसाठी संपर्क करण्याकरिता ईमेल अ‍ॅड्रेस आणि/किंवा फोन नंबर.
  • प्रतिबंधित वस्तू किंवा सेवांच्या प्रचारात्मक ऑफर. उदाहरणार्थ, तुम्ही डील, कूपन, किमतीसंबंधित माहिती किंवा प्रतिबंधित उत्पादन किंवा सेवेच्या इतर जाहिराती दाखवणारा आशय अपलोड करू नये.

लक्षात ठेवा, की या उत्पादनांची प्रासंगिक स्वरूपातील सादरीकरणे या धोरणातून वगळली आहेत. उदाहरणांमध्ये पुढील घटकांचा समावेश आहे:

  • मेनूच्या इमेज.
  • अल्कोहोलयुक्त पेये असलेल्या, पण त्या केंद्रस्थानी नसलेल्या इमेज.
धोकादायक आशय

Google Maps हे वापरकर्त्यांना एकमेकांशी सुरक्षित संभाषणे करता येण्यासाठीचे ठिकाण आहे. म्हणूनच, आम्ही वापरकर्त्यांना धोकादायक आशय पोस्ट करण्याची परवानगी देत नाही.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • आरोग्य, सुरक्षितता, मालमत्ता, प्राणी किंवा पर्यावरणाला प्रत्यक्ष गंभीर हानी पोहोचवणे सुलभ करणारा किंवा त्यास प्रोत्साहन देणारा आशय.
  • धोकादायक अ‍ॅक्टिव्हिटींना प्रोत्साहन देणारा आशय, ज्यामुळे ते कृत्य करणारी व्यक्ती, तिच्या आजूबाजूला असलेले लोक किंवा प्राण्यांना गंभीर शारीरिक इजा होऊ शकते.
  • धोकादायक अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा धोकादायक वस्तू वापरण्यासाठी अल्पवयीनांना प्रोत्साहन देणारा आशय.
  • मुळातच धोकादायक असलेल्या वस्तूंचा गैरवापर सुलभ करणारा आशय.
  • धोकादायक वस्तू तयार करण्यासाठी असलेला सूचनात्मक आशय. 

आम्ही हानिकारक किंवा धोकादायक असू शकणाऱ्या वस्तू, सेवा अथवा अ‍ॅक्टिव्हिटींचा चर्चेमध्ये प्रचार केला जात नाही किंवा हानिकारक वापर करण्यासंबंधित दिशानिर्देश दिले जात नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबद्दल सामान्य चर्चा करण्याची अनुमती देतो. 

बेकायदेशीर आशय

आम्ही बेकायदेशीर असलेला किंवा बेकायदेशीर ॲक्टिव्हिटीचे वर्णन करणारा आशय स्वीकारत नाही.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • कॉपीराइटचे आणि इतर कोणाच्याही कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या इमेज किंवा इतर कोणताही आशय. अधिक माहितीसाठी किंवा DMCA विनंती दाखल करण्यासाठी, आमच्या कॉपीराइट प्रक्रियांचे पुनरावलोकन करा.
  • लैंगिक गैरवर्तनाच्या सर्व इमेजरी आणि लहान मुलांना लैंगिक पद्धतीने सादर करणारा सर्व आशय.
  • धोकादायक किंवा बेकायदेशीर कृतींवरील आशय जसे की: बलात्कार, अवयवांची विक्री, मानवी तस्करी..
  • बेकायदेशीर उत्पादने आणि सेवा: धोक्यात असलेल्या प्राण्यांपासून तयार केलेली उत्पादने, बेकायदेशीर औषधे, बेकायदेशीर बाजारात पाठवलेली प्रीस्क्रिप्शन आवश्यक असलेली औषधे.
  • ग्राफिक स्वरूपातील किंवा अहेतूक हिंसेच्या अथवा हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या इमेज.
  • दहशतवादी गटाने किंवा त्यांच्यावतीने निर्माण केलेला आशय.

इतर कोणत्याही कायदेशीर समस्यांसाठी, कृपया समस्येची तक्रार करणे या वैशिष्ट्यावरील “कॉपीराइट किंवा इतर कायदेशीर समस्या” हा टॅब निवडा.

लहान मुलाची सुरक्षितता

आम्ही Google Maps वर, लहान मुलांना धोक्यात टाकणाऱ्या आशयाला अनुमती देत नाही. लहान मुलांचे शोषण किंवा गैरवर्तन करणारा आशय तयार, पोस्ट अथवा वितरित करू नका अथवा त्यांना धोक्यात टाकणारी Google उत्पादने किंवा सेवा वापरू नका.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारा किंवा त्यांना लैंगिक पद्धतीने सादर करणारा आशय. 
  • हिंसक वर्तनाचा समावेश असलेला, त्याला पाठिंबा देणारा, त्याचे उदात्तीकरण करणारा किंवा त्याला सकारात्मक पद्धतीने सादर करणारा आशय. 
  • अल्पवयीनांशी गैरवर्तनाचे सादरीकरण असलेला किंवा त्याला पाठिंबा देणारा, त्याचे उदात्तीकरण करणारा अथवा त्याला सकारात्मक पद्धतीने सादर करणारा आशय.
  • वरील वर्गवाऱ्यांमध्ये येत नसला, तरीही वरकरणी अल्पवयीन दिसणाऱ्यांची नग्नता दाखवणारा आशय.

आम्ही उल्लंघन करणारा आशय काढून टाकू आणि योग्य कारवाई करू, ज्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याला किंवा कायदा अंमलबजावणी संस्थांकडे तक्रार करणे, उत्पादनाच्या वैशिष्ट्यांचा अ‍ॅक्सेस मर्यादित करणे आणि खाती बंद करणे यांचा समावेश असू शकतो.

वापरकर्ते उल्लंघनांची तक्रार कशी करू शकतात?

  • लहान मुलाचे शोषण करू शकणाऱ्या Google उत्पादनावरील आशयाची तक्रार करण्यासाठी, गैरवर्तनाची तक्रार करणे वर क्लिक करा. तुम्हाला इंटरनेटवर इतरत्र कुठेही आशय आढळल्यास, कृपया तुमच्या देशातील योग्य एजन्सी शी थेट संपर्क साधा.
  • लहान मुलाला धोका आहे किंवा त्याच्यासोबत गैरवर्तन केले जात आहे, त्याचे शोषण अथवा त्याची तस्करी होत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, पोलिसांशी त्वरित संपर्क साधा. तुम्ही आधीच पोलिसांकडे तक्रार केली असल्यास आणि तरीही मदतीची आवश्यकता असल्यास किंवा आमच्या उत्पादनांमुळे अथवा सेवांमुळे लहान मूल धोक्यात येत आहे किंवा येत होते याबद्दल तुम्हाला चिंता वाटत असल्यास, तुम्ही Google कडे वर्तनाची तक्रार करणे हे करू शकता.
दहशतवादासंबंधित आशय

Google Maps हे दहशतवादासंबंधित आशय आणि भरतीच्या समावेशासह कोणत्याही उद्देशासाठी दहशतवादी संघटनांद्वारे या सेवेचा वापर करण्यास प्रतिबंधित करते.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • हिंसेला उत्तेजन देणारा, दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देणारा किंवा दहशतवादी हल्ल्यांचा आनंद व्यक्त करणारा आशय.
  • दहशतवादी गटाने किंवा त्यांच्यावतीने निर्माण केलेला आशय.

वापरकर्त्यांना संदर्भ समजण्यासाठी पुरेशी माहिती दिली गेली असल्यास, आम्ही शैक्षणिक, माहितीपट, वैज्ञानिक किंवा कलात्मक हेतूंसाठी दहशतवादासंबंधित आशयाला अनुमती देऊ शकतो.

माहितीची गुणवत्ता

विषयांतर

तुमच्या अनुभवावर किंवा विशिष्ट स्थानासंबंधित अनुभवांबद्दलच्या प्रश्नांवर आधारित असेल, असाच आशय पोस्ट करा.

आम्ही सामान्य, राजकीय किंवा सामाजिक भाष्य अथवा वैयक्तिक भांडवलासाठी असलेल्या आशयाला अनुमती देत नाही. 

COVID-19

आम्ही COVID-19 संबंधित पुढील आशय हा विषयांतर असल्याचे मानत असल्यामुळे त्याला अनुमती देत नाही:

  • COVID-19 चा उपचार, प्रतिबंध, निदान, संसर्ग किंवा अस्तित्व याविषयी जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मार्गदर्शन यासारख्या प्रस्थापित, स्थिर वैद्यकीय सहमतींना विरोध दर्शवणारी चुकीची वैद्यकीय माहिती.
  • त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या संरक्षणासाठी COVID च्या सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवसायावर केलेली टीका, ज्यामध्ये स्वच्छतेच्या सुधारित पद्धती, व्यवसायाच्या तासांमध्ये केलेले बदल, सामाजिक अंतरासंबंधित प्रोटोकॉल, मास्कसंबंधित आवश्यकता, निगेटिव्ह चाचणीसंबंधित आवश्यकता आणि लसीकरणाच्या पुराव्यासंबंधित आवश्यकता यांचा समावेश आहे, पण ती यापुरतीच मर्यादित नाही.
जाहिरात आणि मागणी

जाहिरात किंवा मागणी या उद्देशांनी आशय पोस्ट करू नका.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • प्रचारात्मक किंवा व्यावसायिक आशय.
  • तुमच्या परीक्षणांमध्ये ईमेल अ‍ॅड्रेस, फोन नंबर, सोशल मीडिया लिंक किंवा इतर वेबसाइटच्या लिंक पोस्ट करणे.
निरर्थक आणि पुनरावृत्ती होणारा आशय

आम्‍ही Google Maps वर पुनरावृत्ती होणारा किंवा निरर्थक आशय पोस्‍ट करण्‍याची अनुमती देत नाही, कारण तो Google Maps त्यांच्या वापरकर्त्‍यांना पुरवत असलेली उपयुक्त माहिती कमी करतो.

यामध्‍ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • एकाच प्रकारचा आशय एकाहून अधिक वेळा पोस्ट करणे किंवा एकाहून अधिक खात्यांमधून एकाच ठिकाणासाठी आशय पोस्ट करणे.
  • कोणत्याही भाषेत अर्थ नसलेला आशय पोस्ट करणे, जसे की वर्णांचा गट.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2222745030453219512
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false