फोटो आणि व्हिडिओशी संबंधित निकष

हे धोरण अपडेट केले गेले आहे. तुम्ही सध्याचे धोरण येथे शोधू शकता.

प्रतिबंधित आशय मार्गदर्शक तत्त्वांव्यतिरिक्त, फोटो आणि व्हिडिओ हे पुढील निकषांच्या अधीन आहेत.

स्क्रीनशॉट, स्टॉक फोटो, GIFs, मॅन्युअली तयार केलेली इतर इमेजरी किंवा इतर पक्षांनी घेतलेली इमेजरी अपलोड करू नये. सुसंबद्ध असावेत यासाठी वापरकर्त्यांनी फोटो किंवा व्हिडिओ हे त्याच स्थानावर घेतलेले असणे आवश्यक आहे. (व्यक्ती/गट केंद्रस्थानी असलेल्या सेल्फी फोटोच्या समावेशासह) आशयाचा प्राथमिक विषय हा स्थानाशी संबंधित नसल्यास, तो काढून टाकला जाऊ शकतो. 

शैलीशी संबंधित अ‍ॅडजस्टमेंट

  • शैलीशी संबंधित बदल किरकोळ असल्यास आणि बॉर्डर, मजकूर, कोलाज केलेल्या इमेज यांसारख्या घटकांना जोडलेले नसल्यास, अशा शैलीशी संबंधित अ‍ॅडजस्टमेंट (जसे की लागू केलेले फिल्टर) स्वीकारल्या जातात.
  • तुम्ही शेअर करत असलेल्या ठिकाणाबाबत समजून घेणे इतरांसाठी अवघड करणारा आशय नाकारला जाऊ शकतो.
  • उदाहरणार्थ, अतिशय गडद किंवा ब्लर इमेज, लक्षणीयरीत्या फिरवलेल्या रचना आणि ठिकाणाचे रूप मोठ्या प्रमाणात बदलून टाकेल असे फिल्टर वापरणे.
  • इमेजचे रेझोल्यूशन पुरेसे असणे आवश्यक आहे. फोटोचा प्रकार आणि तो कुठून अपलोड केला जात आहे, त्यानुसार रेझोल्यूशनशी संबंधित नेमक्या आवश्यकता बदलू शकतात. ब्लर, फोकस नसलेले किंवा सामान्यतः कमी गुणवत्तेचे फोटो/व्हिडिओ हे काढले अथवा नाकारले जाऊ शकतात.
  • व्हिडिओसाठी फक्त स्थिर आणि चांगली व्हिज्युअल गुणवत्ता असलेला आशय अपलोड करा. फोकस नसलेला, डळमळीत किंवा खराब एक्सपोजर असलेला आशय अपलोड करू नये. विरूपित किंवा करप्ट व्हिडिओना अनुमती नाही.

सुपरइंपोज केलेला मजकूर किंवा ग्राफिक

लोगोसारख्या प्रमोशनपर आशयाच्या समावेशासह सुपरइंपोज केलेला मजकूर किंवा ग्राफिक हे पुढील आवश्यकतांच्या अधीन आहेत:

  • 360 फोटोसाठी, सुपरइंपोज केलेला आशय हा वरच्या किंवा खालच्या भागापर्यंत मर्यादित असावा (समभुज आयताकार इमेजच्या वरच्या किंवा खालच्या भागाच्या २५%), पण तो दोन्ही भागांमध्ये असू शकत नाही.
  • पारंपरिक डिजिटल फोटो आणि व्हिडिओसाठी, सुपरइंपोज केलेला आशय हा इमेज किंवा व्हिडिओचा १०% हून अधिक भाग व्यापून टाकू शकत नाही आणि तो एका टोकापर्यंत मर्यादित असावा.
  • सुपरइंपोज केलेला मजकूर किंवा ग्राफिक सुसंबद्ध असावीत.
  • विचलित करणाऱ्या सुपरइंपोज केलेल्या मजकुराला किंवा ग्राफिकला परवानगी नाही.

360 फोटो

  • 360 फोटो हे इमेजरीच्या कडांशी कोणतेही अंतर न ठेवता 360º व्यापलेले असावेत. या इमेज वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत (वरपासून तळापर्यंत) व्यापलेल्या नसाव्यात, पण तुमच्या 360 फोटोच्या वरच्या आणि खालच्या कडांच्या दरम्यान फक्त किरकोळ अंतर/छिद्रे स्वीकारार्ह आहेत.
  • स्टिचिंगच्या किरकोळ एरर स्वीकारार्ह आहेत, पण लक्षणीय स्टिचिंग आर्टिफॅक्ट असलेल्या इमेज नाकारल्या जाऊ शकतात.
  • 360 फोटो किमान 4K (३,८४० पिक्सेल बाय २,१६० पिक्सेल रेझोल्यूशन किंवा त्याहून अधिक) असणे आवश्यक आहे.
  • एका भागामध्ये एकाहून अधिक 360 फोटो प्रकाशित केले जातात, तेव्हा त्यांच्यामधील परस्परसंबंध आपोआप तयार केले जाऊ शकतात. तुमची कनेक्‍शन मॅन्‍युअली किंवा आपोआप तयार केली गेली असली, तरीही वास्तविक, कनेक्ट केलेल्या पाहण्याच्या अनुभवाची खात्री करण्यासाठी आम्‍ही नवीन कनेक्शन अ‍ॅडजस्ट करू शकतो, काढून टाकू शकतो किंवा तयार करू शकतो आणि तुमच्या 360 फोटोची स्थिती व ओरिएंटेशन अ‍ॅडजस्ट करू शकतो
  • 360 फोटो कनेक्ट करताना, तुम्ही तयार केलेल्या कोणत्याही लिंक या जवळपासच्या निरीक्षण स्थळांदरम्यान असल्याची खात्री करा. पहिल्यांदाच तुमचे कनेक्ट केलेले 360 फोटो एक्सप्लोर करणार्‍यांची दिशाभूल होईल अशी कनेक्शन तयार करण्याचा प्रयत्न करू नका.
  • एखाद्या भागामध्ये एकाहून अधिक 360 फोटो प्रकाशित करताना, मेसेज लिहिण्यासाठी, चिन्हे, चित्रे काढण्यासाठी किंवा नकाशाचे रूप बदलण्यासाठी नकाशाच्या खुणा/बिंदू यांसंबंधित समीपता किंवा त्यामुळे मिळणारे नकाशाचे निळ्या रेषांच्या स्वरूपातील व्हिज्युअलायझेशन कधीही वापरू नका.
  • तुम्ही तुमच्या 360 फोटोच्या वरच्या किंवा खालच्या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा ॲट्रिब्यूशन (वॉटरमार्क, लेखकत्वाशी संबंधित माहिती इ.) जोडत असल्यास, कृपया सुपरइंपोज केलेला मजकूर किंवा ग्राफिक यासंबंधित वरील विभागांतर्गत संबंधित आवश्यकता लक्षात घ्या.

 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2763229997742600303
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false