आमची मदत केंद्रे आणि धोरणे यांचे अवलोकन

आम्ही सुदृढ वापरकर्ता योगदान इकोसिस्टीमला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो, जी विश्वासार्ह आणि पारदर्शक आहे व वापरकर्त्यांसाठी काम करते. तुमच्या Google Maps च्या वापरासाठी Google ची धोरणे समजून घेण्यात तुम्हाला मदत करणे हा या मदत केंद्राचा उद्देश आहे.

ही धोरणे आमच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि सकारात्मक अनुभव निर्माण करण्यासाठी व लागू कायद्यांचे पालन करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. काय समाविष्ट आहे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील धोरण किंवा मदत केंद्राचा विस्तार करा.

Google Maps मदत केंद्र

  • Google Maps कसे वापरावे: तुम्‍हाला जिथे जायचे आहे तिथे तुम्‍ही कसे पोहोचावे, नकाशा आणि नकाशाशी संबंधित इतर सेवा कशा वापराव्या व तुमचा Maps अनुभव कस्टमाइझ किंवा संपादित कसा करावा याविषयीची माहिती या पेजवर दिली आहे.
  • सेटिंग्ज आणि प्राधान्ये बदलणे: तुम्‍ही वेगवेगळ्या भाषांमध्‍ये नकाशे कसे अ‍ॅक्सेस करू शकता, तुमच्‍या स्‍थानाची अचूकता कशी सुधारू शकता, तुमच्‍या गोपनीयतेचे संरक्षण कसे करू शकता आणि तुमचा डेटा कसा व्‍यवस्‍थापित करू शकता याविषयीची माहिती या पेजवर दिली आहे.
  • Map आणि Search परिणाम व शिफारशी: तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्‍यासाठी तुमची सेटिंग्ज आणि उपलब्ध असलेली नियंत्रणे यांनुसार परिणाम कसे दाखवले जावेत याविषयीची माहिती या पेजवर दिली आहे.

Maps UGC धोरण मदत केंद्र

  • तुमचा आशय Maps वर कसा दिसू शकतो: परीक्षणे, फोटो आणि व्हिडिओ यांसारखी तुमची योगदाने Maps वर कशी व कुठे प्रकाशित केली जाऊ शकतात हे समजण्यात ही पेज मदत करतात. आम्ही Maps वर आशय जोडण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेदेखील प्रदान करतो.
  • निषिद्ध आणि प्रतिबंधित आशय: Maps वर अनुमती नसलेल्या योगदानांविषयी किंवा काही ठिकाणांच्या बाबतीत पोस्ट करण्यावर निर्बंध असल्यास त्याविषयीची माहिती या पेजवर दिली आहे. तसेच, काढून टाकण्यासाठी Maps वरील संभाव्य निषिद्ध किंवा प्रतिबंधित आशय कसा फ्लॅग करावा याविषयी आम्ही मार्गदर्शन देतो.
  • गोपनीयता आणि सेटिंग्ज: Maps त्याच्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करते आणि तुम्ही Maps वर तुमची वैयक्तिक प्राधान्ये कशी अ‍ॅडजस्ट करू शकता.

Google Business Profile मदत केंद्र

  • Google वर तुमच्या व्यवसायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे: तुमची व्यवसाय प्रोफाइल व्यवस्थापित करणे, सपोर्ट असलेले प्रदेश, तसेच आमची धोरणे आणि मार्गदर्शन तत्त्वे याविषयीची माहिती या पेजवर दिली आहे.
  • तुमच्या व्यवसाय खात्यासाठी Google Maps वापरणे: तुमच्या व्यवसायाच्या आवश्यकतांसाठी तुम्ही Google Maps कसे वापरू शकता याविषयीची इनसाइट या पेजवर दिली आहे. आमच्या उत्पादन मंजुरीच्या आवश्यकता, कपटपूर्ण कॉलपासून तुम्ही कसे संरक्षण करू शकता, तृतीय पक्षांसोबत काम करणे आणि तुमच्या व्यवसायाशी संबंधित आमच्या फोटो व व्हिडिओ आवश्यकता याविषयीची माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.
  • Business Profile ची सर्व धोरणे आणि सेवा अटी: हे पेज तुम्हाला अतिरिक्त सेवा अटी याविषयीची माहिती देते, ज्यामध्ये विवादांचे निराकरण करणे आणि तुमच्या आशयाचा अ‍ॅक्सेस यांसारखे विषय समाविष्ट आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसाय प्रोफाइलद्वारे Maps वरील सकारात्मक अनुभवासाठी कसे योगदान देऊ शकता याची माहितीदेखील आम्ही देतो.

Google My Maps मदत केंद्र

  • वैयक्तिक नकाशा तयार करणे आणि निषिद्ध आशय: Google My Maps वापरून तुमचा वैयक्तिक नकाशा अनुभव तयार करणे आणि Maps वर हे वैशिष्ट्य वापरताना निषिद्ध असलेले ११ प्रकारचे आशय याविषयीची माहिती या पेजवर दिली आहे.

Google स्थानिक सूची मदत केंद्र

  • स्थानिक सूची आणि माहिती अपडेट करण्याविषयी: नाव, फोन नंबर आणि पत्ता यांसारखी ठिकाणांविषयीची अप-टू-डेट माहिती कोणत्या स्रोतांवरून मिळवली जाते व स्थानिक सूचीमध्ये कसे बदल केले जाऊ शकतात आणि त्या कशा काढून टाकल्या जाऊ शकतात याविषयीची माहिती देते.

Google स्थानिक मार्गदर्शक मदत केंद्र

  • मार्गदर्शक बनणे आणि समुदायाची माहिती: तुम्ही Google Maps साठी स्थानिक मार्गदर्शक कसे बनू शकता आणि वापरकर्त्यांसाठी Maps अनुभवात तुम्ही कसे योगदान देऊ शकता व त्यामध्ये कशी सुधारणा करू शकता याविषयीची माहिती देते.

Google ने योगदान दिलेले मार्ग दृश्य इमेजरी धोरण

  • स्वीकार्य आशय: आम्ही अयोग्य आशय कसा हाताळतो आणि Google Maps वर मार्ग दृश्य इमेजरी प्रकाशित करताना कोणते निकष वापरतो.

Google Maps Platform चे संमत वापर धोरण

  • संमत वापर: या पेजवर उल्लंघनांचे प्रकार समाविष्ट आहेत, ज्यामुळे तृतीय पक्ष Google Maps सेवा कसे वापरतात यामध्ये बदल होऊ शकतो.

Google Maps आणि Google Earth च्या अतिरिक्त सेवा अटी

  • परवाना देणे आणि वापर: तुम्ही Google Maps आणि Google Earth कसे वापरू शकता व तुम्हाला करण्याची परवानगी असलेल्या विशिष्ट गोष्टी तसेच, या पेजवर आम्ही नकाशा परिणाम आणि आशयापेक्षा वास्तविक स्थिती कशा वेगळ्या असू शकतात हे संबोधित करतो.
  • निषिद्ध आचरण: Google Maps आणि Google Earth वापरताना कोणत्या कृतींना अनुमती नाही.
  • अपलोड केलेला आशय: तुम्ही दिलेला आणि Google Maps व Google Earth वर अपलोड केलेला आशय आम्ही कसा वापरू शकतो.

धोरण अंमलबजावणी समजून घेणे

या धोरणांचे उल्लंघन करणारा आशय मॉडरेट करण्यासाठी आम्ही ऑटोमेटेड आणि मानवी मूल्यमापनाचे कॉंबिनेशन वापरतो. आमच्या वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यात आणि आमचे Map प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी, आमची अंमलबजावणी तंत्रज्ञाने मानवी परीक्षणकर्त्यांच्या निर्णयांवर आधारित अल्गोरिदम व मशीन लर्निंग वापरतात. आमच्या विशेष प्रशिक्षित तज्ञांद्वारे अधिक गुंतागुंतीच्या, क्लिष्ट किंवा गंभीर प्रकरणांचे बऱ्याचदा पुनरावलोकन आणि मूल्यमापन केले जाते.

आमच्या धोरणांचे उल्लंघन करणार्‍या आशयावर आम्ही कारवाई करतो आणि आमच्या धोरणांचे वारंवार झालेले उल्लंघन गांभीर्याने घेतो. यामध्ये आशय नाकारणे किंवा वारंवार झालेल्या अथवा गंभीर उल्लंघनांसाठी खाती निलंबित करणे समाविष्ट असू शकते. आम्ही आमच्या धोरणांचे वारंवार झालेले उल्लंघन गांभीर्याने घेतो आणि वारंवार उल्लंघन करणाऱ्यांसाठी स्ट्राइक सिस्टीम आहे.

आम्ही केलेल्या कोणत्याही धोरण उल्लंघन अंमलबजावणीसंबंधित कारवायांविषयी तुम्हाला आमच्या निर्णयाची माहिती देऊ. तुमची पोस्ट नाकारली गेल्यास, तुम्ही ती पोस्ट दुरुस्त करू शकता किंवा निर्णयावर आवाहन करू शकता. तुम्ही खाते निलंबनाच्या निर्णयावरदेखील आवाहन करू शकता. तथापि, आवाहन करण्यासाठी, तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3391006841808399663
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false