परिवहनाशी संबंधित पेमेंटचे पर्याय वापरण्यास सुरुवात करणे

Google Maps हे अशा वैशिष्ट्यांची सुविधा देते, जी तुम्हाला परिवहन प्रवासांमध्ये तिकिटाचे पर्याय शोधण्यात मदत करतात.

आम्ही परिवहनाशी संबंधित पेमेंटचे पर्याय कसे रँक करतो

तिकिटाचे एकाहून अधिक पर्याय असतात, तेव्हा Google Maps हे पुढील घटकांच्या आधारे परिवहन एजन्सीना रँक करते: 

  • डेटाची अचूकता: अचूक आणि रीअल-टाइम प्रस्थान व आगमनाशी संबंधित वेळेचा डेटा पुरवणार्‍या परिवहन एजन्सीना उच्च स्थान दिले जाते.
  • लोकप्रियता: तिकिटाच्या पर्यायांना त्यांच्या रूपांतर दरांनुसार प्राधान्य दिले जाते.
  • सुलभता: पुरवठादाराचा चेकआउट अनुभव कितपत सोपा आहे यानुसार.

वापरकर्त्यांकडे संपूर्ण Google Maps वर नेहमी सर्वात अचूक परिवहन डेटा असल्याची खात्री करण्यासाठी सामान्यतः डेटा अचूकता हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो.

तुम्हाला हे परिणाम दाखवण्यासाठी, Google Maps हे अनेक तिकीट पुरवठादारांसोबत भागीदारी करते, जसे की परिवहन एजन्सी, ऑपरेटर आणि तृतीय पक्ष पुनर्विक्रेते. परिणाम हे उपलब्ध असलेले सर्व भागीदार दाखवू शकत नाहीत.

"एजन्सी माहिती" या अंतर्गत, तुम्ही रीअल-टाइम प्रस्थान माहिती उपलब्ध नसलेल्या एजन्सीची तिकिटे शोधू शकता. पुरवठादाराने अनुमती दिल्यास, तुमच्या प्रवासाची माहिती आपोआप भरलेली असते.

पुरवठादाराच्या प्राधान्यांच्या आधारे, तुम्ही Google Wallet द्वारे तिकिटे खरेदी करू शकता आणि ती सेव्ह करू शकता. तिकिटाच्या प्रकारानुसार पेमेंटचा अनुभव बदलतो.

  • परिवहन एजन्सी ज्या ओपन-लूप पेमेंट स्वीकारतात: तुम्ही तुमच्या पसंतीच्या पेमेंट पर्यायासह पेमेंट करण्यासाठी टॅप करू शकता.
  • क्लोज-लूप पेमेंट कार्ड स्वीकारणाऱ्या परिवहन एजन्सी: तुम्ही थेट Google Wallet मध्ये तुमचे परिवहन कार्ड खरेदी करू शकता, जोडू शकता आणि रिचार्ज करू शकता.
  • व्हिज्युअल तिकिटे आणि बारकोड तिकिटांसारखे प्रवासी पास: तुम्हाला पुरवठादाराच्या खरेदी साइटवर नेले जाईल, जेथे तुम्ही Google Wallet मध्ये तिकीट सेव्ह करू शकता.

Google Wallet मध्ये तुमची खरेदी केलेली तिकिटे शोधणे

“Wallet मधील तुमचा डेटा” यामध्ये, तुम्ही “संपूर्ण Google वर पास वापरा” आणि “पास डेटा व्यवस्थापित करा” हे सुरू केल्यास, तुम्हाला तुमची खरेदी केलेली तिकिटे पाहता येतील. बर्‍याच तिकिटांसाठी, तुम्ही तुमचा फोन टॅप करून तुमच्या प्रवासासाठीचे पैसे देऊ शकता. तुम्ही Google Wallet मधून बारकोड आणि QR कोड तिकिटे अ‍ॅक्सेस करू शकता आणि ती वापरू शकता.

एकाहून अधिक एजन्सीमधून तिकिटे खरेदी करणे

काही प्रदेशांमध्ये, एका परिवहन एजन्सीकडून खरेदी केलेली तिकिटे ही त्या प्रदेशातील इतर एजन्सीसाठी वापरण्याकरिता वैध असू शकतात. Google Maps द्वारे प्रवासाकरिता तिकीट खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्याकडे असलेली सद्य तिकिटे आणि आगामी प्रवासासाठीची त्यांची वैधता तपासावी अशी आम्ही शिफारस करतो. तुम्ही कंफर्म करण्यासाठी तुमच्या तिकीट पुरवठादाराशीदेखील संपर्क साधू शकता.

तुम्ही Google Maps द्वारे तिकीट खरेदी करता, तेव्हा तिकिटामध्ये किमान त्या प्रवासाच्या सूचित भागाचा समावेश केला जाईल. तिकिटांमध्ये तुमच्या प्रवासाच्या इतर भागांचादेखील समावेश असू शकतो. तपासण्यासाठी तुमच्या तिकीट पुरवठादाराशी संपर्क साधा.

परिवहन पेमेंटबद्दल अधिक माहिती

  • नवजात बालके आणि विद्यार्थी यांसाठी विशेष किमतींचा अद्याप समावेश केलेला नाही.
  • हे वैशिष्ट्य फक्त Android वरील Google Mobile Maps वर उपलब्ध आहे. सर्व देश आणि प्रदेश हे भागीदार उपलब्धतेच्या अधीन आहेत.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18126505858206991117
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false