SOS Alerts: झपाट्याने येणाऱ्या पुराचे नकाशे

जिथे पूर येतो अशा प्रभावित भागांचा अंदाज लावणारे झपाट्याने येणाऱ्या पुराचे नकाशे तुम्ही मिळवू शकता. हे नकाशे तुम्हाला आपत्तीदरम्यान सुरक्षित आणि जागरूक राहण्यात मदत करू शकतात. Google SOS Alerts बद्दल अधिक जाणून घ्या.

आम्हाला डेटा कुठे मिळतो

आम्ही युरोपिअन स्पेस एजन्सीच्या Copernicus Sentinel-1 उपग्रहांसारख्या स्रोतांकडून मिळणारा उपग्रह डेटा वापरतो. हा उपग्रह सिंथेटिक ॲपर्चर रडार(SAR) इमेज तयार करतो, जी आमचे अल्गोरिदम पूरग्रस्त भागाची गणना करण्यासाठी वापरतात.

नकाशा कधी अपडेट केला जातो

नवीन उपग्रह इमेज उपलब्ध असते, तेव्हा आम्ही पुराचे नकाशे अपडेट करतो. इमेज घेतल्यावर ती आमच्या सिस्टीममध्ये येण्यासाठी काही तास लागतात. आम्हाला वापरता येईल अशी उपग्रह इमेज तयार करण्यासाठी काही दिवसदेखील लागू शकतात. आमच्याकडे उपलब्ध असलेली नवीनतम इमेज ही ७२ तासांपेक्षा जुनी असल्यास, सामान्यतः नवीन इमेज उपलब्ध होईपर्यंत आम्ही ती दाखवणे थांबवतो.

नकाशाची अचूकता

उपग्रह इमेजवरून पूरग्रस्त आणि पूर नसलेले भाग ओळखणे कठीण असते, त्यामुळे काहीवेळा चुका होऊ शकतात. उदाहरणार्थ, नकाशे कदाचित घनदाट जंगल किंवा शहरी भागांमधील पूर दाखवू शकणार नाहीत. सरासरी इमेजसाठी, आमचा अंदाज आहे, की सुचवलेला पूरग्रस्त भाग सुमारे ८०% अचूक असतो. पूरग्रस्त म्हणून मार्क न केलेले भाग हे सुरक्षित आहेत असा पूर्वानुमान केला जात नाही, कारण आम्ही घनदाट जंगल आणि शहरी भागांमधील नकाशे दाखवू शकत नाही.

नकाशा उपलब्ध नाही

काही बाबतींत, तुम्हाला कदाचित पुराचा नकाशा मिळणार नाही. काहीवेळा उपग्रह इमेज उपलब्ध नसते किंवा ती इमेज पात्र नकाशा जनरेट करत नाही.

 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12406854834027665327
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false