"GPS सिग्नल गमावला आहे" या Google Maps मध्ये सातत्याने मिळणाऱ्या सूचना ट्रबलशूट करणे

नेव्हिगेशनदरम्यान Google Maps हे टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश देण्यासाठी तुमचे स्थान ट्रॅक करते. पण, तुमचे स्थान विश्वसनीयरीत्या निर्धारित करता येत नसल्यास, तुम्हाला "GPS सिग्नल गमावला आहे" असा मेसेज मिळू शकतो.  GPS सिग्नल हे इनडोअर किंवा अंडरग्राउंड असताना उपलब्ध नसल्यामुळे, कधीकधी असे होणे अपेक्षित आहे. पण, तुम्हाला हा मेसेज खूप वेळा मिळत असल्यास, तो एखादी समस्या असल्याचे दर्शवत असू शकतो, जसे की बॅटरी कमी आहे किंवा फोन अथवा GPS युनिटमध्ये बिघाड झाला आहे.

टीप: तुमच्या डिव्हाइसला GPS सिग्नल मिळवण्याची संधी मिळाल्यावरच Google Maps हे "GPS सिग्नल गमावला आहे" हे प्रदर्शित करेल.

Google Maps शी संबंधित समस्या आहे का हे तपासणे

  • तृतीय पक्ष GPS स्टेटस अ‍ॅप्लिकेशन इंस्टॉल करून पहा.
  • तुमचे डिव्हाइस पूर्णपणे चार्ज केलेले असताना आणि निरभ्र आकाश असेल तेव्हा बाहेर असताना GPS सिग्नल मिळवू शकत नसल्यास, ते दुरुस्त करावे लागू शकते.
  • आम्ही विशेषतः Android डिव्हाइसवर वेगळ्या नेव्हिगेशन अ‍ॅपऐवजी GPS स्टेटस अ‍ॅप्लिकेशनची शिफारस करतो, कारण दुसरे नेव्हिगेशन अ‍ॅप हे GPS वर आधारित नसलेले स्थानासंबंधित सिग्नल वापरू शकते.

टीप: तुम्ही नेव्हिगेट करत नसताना Google Maps ने तुमचे स्थान दाखवल्यास, त्याचा अर्थ तुमच्या फोनमध्ये GPS सिग्नल आहे, असा होत नाही. आधुनिक फोनमध्ये तुमचे स्थान निर्धारित करण्याचे अनेक मार्ग असतात, पण Google Maps ला अ‍ॅक्टिव्ह नेव्हिगेशनसाठी GPS/GNSS स्थान लागते.

तुम्ही GPS सिग्नल गमावण्याची इतर कारणे तपासणे

  • Google Maps ला फक्त विशिष्ट परिस्थितींमध्ये तुमचे स्थान अ‍ॅक्सेस करता येईल अशा स्थान परवानग्या तुम्ही सेट केल्या असल्यास, ते इतर वेळेस "GPS सिग्नल गमावला आहे" असे सूचित करू शकते.
  • ग्लेअर कमी करणाऱ्या काही प्रकारच्या कार विंडो फिल्मचा बेस हा धातूचा असतो, जो GPS सिग्नलला तुमच्या कारमध्ये तुमच्या फोनपर्यंत पोहोचण्यापासून ब्लॉक करतो.
  • काही फोनमध्ये बॅटरी सेव्हर वैशिष्ट्य असते, जे त्यांची बॅटरी कमी असताना GPS बंद करते.
    • काही फोन हे फक्त विशिष्ट परिस्थितींमध्येच करतात, जसे की बॅटरी कमी असते आणि स्क्रीन बंद असते या दोन्ही गोष्टी असतात तेव्हा किंवा Google Maps बॅकग्राउंडमध्ये असते तेव्हा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5358465458338647559
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false