स्थान शेअरिंग संबंधित सूचना मिळवणे

एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत तिचे स्थान शेअर केल्यावर, ती घर किंवा ऑफिस यांसारख्या एखाद्या विशिष्ट स्थानावर पोहोचल्याचे अथवा तेथून निघाल्याचे कळण्यासाठी तुम्ही स्थान शेअरिंग संबंधित सूचना जोडू शकता. 

तुम्ही तुमचे स्थान शेअर करणे किंवा या सूचना कधीही थांबवू शकता. स्थान शेअरिंग थांबल्यावर सूचना थांबतात. ठरावीक खात्यांच्या बाबतीत आणि लिंकद्वारे शेअर करण्याच्या बाबतीत स्थान शेअरिंग संबंधित सूचना उपलब्ध नाहीत.

स्थान शेअरिंग संबंधित सूचना मिळवण्यासाठी, Google Maps सूचना सुरू करणे हे करा.

स्थान शेअरिंग संबंधित सूचना जोडा

  1. तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर स्थान शेअरिंग वर टॅप करा.
  3. जी व्यक्ती तुमच्यासोबत तिचे स्थान शेअर करत आहे, त्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर टॅप करा.
  4. “सूचना” विभागामध्ये, जोडा वर टॅप करा.
  5. “स्थान निवडा” या अंतर्गत, एखादा पत्ता निवडा किंवा स्थान जोडा वर क्लिक करा.
  6. नवीन स्थान निवडण्यासाठी, शोध बारमध्ये पत्ता एंटर करा किंवा नकाशावर निवडा वर क्लिक करा.
  7. स्थान सेट करण्यासाठी, तुमचे बोट संपूर्ण स्क्रीनवरून फिरवा.
  8. पूर्ण झाले वर क्लिक करा.
  9. तुम्हाला सूचना कधी मिळवायची आहे ते निवडा:
    • ती पोहोचते तेव्हा प्रत्येक वेळी: ती व्यक्ती नमूद केलेल्या स्थानावर पोहोचते, तेव्हा प्रत्येक वेळी सूचना मिळवण्यासाठी.
    • ती निघते तेव्हा प्रत्येक वेळी: ती व्यक्ती नमूद केलेल्या स्थानावरून निघते, तेव्हा प्रत्येक वेळी सूचना मिळवण्यासाठी.
  10. सेव्ह करा वर क्लिक करा. 

जी व्यक्ती तिचे स्थान तुमच्यासोबत शेअर करत आहे, तिला हे कळवण्यासाठी ईमेल मिळेल, की तुम्ही ही सूचना जोडली आहे. तिने Google Maps सूचना सुरू केल्या असल्यास, तिलादेखील पुश सूचना मिळेल.

तुमच्यासोबत स्थान शेअर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत, तुम्ही कमाल पाच स्थान शेअरिंग संबंधित सूचना जोडू शकता.

स्थान शेअरिंग संबंधित सूचना बंद करा

तुम्ही एखाद्या विशिष्ट स्थानावर पोहोचल्यावर किंवा तेथून निघाल्यावर कळवले जाण्यासाठी कोणीही सूचना जोडल्यास, तुम्ही ती बंद करू शकता. यामुळे त्यांनी जोडलेल्या कोणत्याही सद्य सूचनादेखील बंद केल्या जातील. तुम्ही सूचना बंद केल्याचे त्यांना सूचित केले जाणार नाही आणि तुम्ही त्यांच्यासोबत स्थान शेअर करणे सुरू ठेवू शकता. शेअरिंग थांबले आणि पुन्हा सुरू झाले, तरीही तुम्ही सूचना सुरू करेपर्यंत त्या बंद केलेल्या राहतील. तुम्ही तुमचे स्थान शेअर करणे थांबवल्यावर या सूचना आपोआप थांबतील.

  1. https://myaccount.google.com/locationsharing वर जा.
  2. “स्थान शेअरिंग संबंधित सूचनांना अनुमती द्या” बंद करा.

स्थान शेअरिंग संबंधित सूचना ट्रबलशूट करा

तुमच्या बाबतीत स्थान शेअरिंग संबंधित सूचना उपलब्ध नसल्यास, पुढील गोष्टी तपासा:

  • जी व्यक्ती तुमच्यासोबत शेअर करत आहे, ती कदाचित ऑफलाइन असेल.
  • तुम्ही कदाचित अ‍ॅपची जुनी आवृत्ती वापरत असाल. अ‍ॅप अपडेट कसे करावे ते जाणून घ्या.
  • शेअर करणाऱ्या व्यक्तीचे वय १३ वर्षांपेक्षा (किंवा त्यांच्या देशात लागू असलेले वय यापेक्षा) कमी आहे.
  • तुम्ही हे स्थान वेबवर किंवा Maps मध्ये साइन इन न करता पाहत आहात का (लिंकद्वारे शेअर केले आहे).

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7723471398180762910
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false