व्हॉइस नेव्हिगेशनसंबंधित समस्यांचे निराकरण करणे

तुम्ही एखाद्या ठिकाणावर नेव्हिगेट करता, तेव्हा तुम्ही तोंडी दिशानिर्देश ऐकू शकता. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर व्हॉइस नेव्हिगेशनसंबंधित समस्यांचे निराकरण कसे करावे ते जाणून घ्या.

पहिली पायरी: तुमच्या डिव्हाइसचा व्हॉल्यूम सुरू करा.

  • तुमच्या फोन किंवा टॅबलेटचा व्हॉल्यूम सुरू असून तो म्यूट केला नसल्याची खात्री करा. तुम्ही नेव्हिगेशन सुरू केल्यानंतर, तुमच्या डिव्हाइसचा व्‍हॉल्‍यूम वाढवा.

दुसरी पायरी: Maps अ‍ॅपमध्ये व्हाॅइस सुरू केला असल्याची खात्री करा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. नेव्हिगेशन सुरू करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, तुम्हाला आवाज Sound असे दिसेल. तुम्हाला हे दिसत नसल्यास, म्यूट करा Mute आणि त्यानंतर आवाज Sound वर टॅप करा. Google Maps बोलायला सुरुवात करेल.

तिसरी पायरी: Maps अ‍ॅपमध्ये व्हॉल्यूम वाढवा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज आणि त्यानंतर आवाजाची पातळी वर टॅप करा.
  3. मोठा निवडा.

चौथी पायरी: कोणते स्पीकर वापरायचे ते निवडा.

  1. तुमच्या फोनवर किंवा टॅबलेटवर, ब्लूटूथ सुरू करा.
  2. तुमचा फोन किंवा टॅबलेट तुमच्या कारसोबत पेअर करा.
  3. तुमच्या कारच्या ऑडिओ सिस्टीमचा स्रोत ब्लूटूथवर सेट करा.
  4. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  5. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  6. पर्याय निवडा:
    • तुमच्या कारमधील स्पीकरवरून नेव्हिगेशन ऐकण्यासाठी, ब्लूटूथवर व्हाॅइस प्ले करा सुरू करा.
    • तुमच्या फोन किंवा टॅबलेटच्या स्पीकरवरून नेव्हिगेशन ऐकण्यासाठी, ब्लूटूथवर व्हाॅइस प्ले करा बंद करा.
      • टिपा:
        • Android साठी Google Maps 9.13 आणि त्यावरील आवृत्तीवर, तुम्ही चाचणी आवाज प्ले करू शकता. चाचणी आवाज प्ले करण्यासाठी, Google Maps अ‍ॅप Maps आणि त्यानंतर तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज आणि त्यानंतर चाचणी आवाज प्ले करा उघडा. तुम्हाला "Google Maps वर नेव्हिगेट करताना असा आवाज येईल" असे ऐकू येईल.
        • तुम्हाला तुमचा फोन किंवा टॅबलेट चार्ज करायचा असल्यास, फक्त चार्जिंगसाठी असलेली USB केबल किंवा पॉवर अडॅप्टर वापरा. ते आउटलेट अथवा सिगारेट लायटरशी कनेक्ट करा.

पाचवी पायरी: तोंडी दिशानिर्देश डाउनलोड करा.

  • काही वेळा तोंडी दिशानिर्देश डाउनलोड केलेले नसतात किंवा ते तुमच्या फोन अथवा टॅबलेटवर अपडेट करण्याची आवश्यकता असते. असे झाल्यास, तुम्हाला तोंडी दिशानिर्देशांऐवजी चाइम ऐकू येईल.
    1. तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केले असल्याची खात्री करा. तुमच्याकडे मजबूत इंटरनेट कनेक्शन असल्यास, तोंडी दिशानिर्देश अधिक जलद डाउनलोड होतील.
    2. दिशानिर्देश मिळवा.
    3. तुम्ही नेहमी वापरता तसे Google Maps अ‍ॅप वापरा. तुम्ही Maps अ‍ॅप उघडलेले असताना तोंडी दिशानिर्देश डाउनलोड होतात.
    4. तोंडी दिशानिर्देश डाउनलोड पूर्ण झाल्यावर, एखाद्या ठिकाणावर नेव्हिगेट करताना तुम्हाला चाइमऐवजी दिशानिर्देश ऐकू येतील.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5715211412020578564
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false