तुमच्या Google Maps अ‍ॅपवर पर्यावरणस्नेही मार्ग वापरणे

महत्त्वाचे: ही वैशिष्ट्ये फक्त निवडक देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत.

Google Maps विविध प्रकारच्या वाहनांसाठी इंधन किंवा ऊर्जाकार्यक्षमतेचा अंदाज लावू शकते, ज्यात इलेक्ट्रिक आणि ज्वलन इंजीन असलेल्या कार, तसेच गॅसद्वारे सक्षम केल्या जाणाऱ्या मोटरसायकलचा समावेश असतो. मार्ग जितका इंधनाची बचत करणारा किंवा ऊर्जाकार्यक्षम असेल, तितका तुमच्या वाहनाचा इंधन अथवा ऊर्जा वापर आणि CO2 उत्सर्जन कमी होते.

सर्वोत्कृष्ट मार्ग निर्धारित करण्यासाठी, हे वैशिष्ट्य सुरू केलेले असल्यास, Maps हे पुढील घटकांव्यतिरिक्त इंधन कार्यक्षमतेचा विचार करेल:

  • रीअल-टाइम रहदारी
  • मार्गाची सुलभता
  • रस्त्याची स्थिती

त्यासोबतच, पोहोचण्यासाठी जलद मार्गाव्यतिरिक्त, तुमच्या गंतव्यस्थानासाठी अनेक मार्ग असेपर्यंत Maps नेहमी सर्वात कार्यक्षम मार्ग हायलाइट करेल.

हे वैशिष्‍ट्य बंद केलेले असल्‍यास, तुम्‍हाला पोहोचण्यासाठी जलद मार्ग मिळेल आणि Google Maps हे मार्गाच्या शिफारशींसाठी इंधन किंवा ऊर्जाकार्यक्षमता या गोष्टीचा विचार करणार नाही. तथापि, तुमच्या इंजीनच्या प्रकाराच्या आधारे, ते हिरवी पाने असलेल्या पर्यायांपैकी इंधन किंवा ऊर्जेची सर्वाधिक बचत होईल असा मार्ग हायलाइट करेल.

पर्यावरणस्नेही मार्ग सुरू किंवा बंद करणे

महत्त्वाचे: ईव्हीसाठीच्या ऊर्जाकार्यक्षम मार्गांमध्ये चार्ज करण्याच्या थांब्यांचा समावेश नसतो.

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. मार्गाचे पर्याय यांवर स्क्रोल करा.
  4. इंधन बचत होईल अशा मार्गांना प्राधान्य देणे सुरू किंवा बंद करा.

Google Maps अ‍ॅपमध्ये तुमच्या इंजीनचा प्रकार निवडा

महत्त्वाचे: हे सेटिंग फक्त कारना लागू होते. मोटारसायकलसाठी, Google Maps तुमच्याकडे गॅसद्वारे सक्षम केलेली मोटरसायकल आहे, असे गृहीत धरेल.

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. मार्गाचे पर्याय यांवर स्क्रोल करा.
  4. इंजीनचा प्रकार वर टॅप करा.
  5. तुम्ही ड्राइव्ह करता त्या वाहनानुसार, तुमचा इंजीनचा प्रकार निवडा.
    • अंतर्गत ज्वलन इंजीन असलेले वाहन: गॅस किंवा डिझेल निवडा.
    • काँप्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) किंवा लिक्विफाइड पेट्रोलिअम गॅस (LPG) वाहन: गॅस निवडा.
    • बहुतांशी इंधनावर चालणारे हायब्रिड किंवा प्लग-इन हायब्रिड: हायब्रिड निवडा.
    • बहुतांशी विजेवर चालणारे ईव्ही किंवा प्लग-इन हायब्रिड: इलेक्ट्रिक निवडा.
  6. पूर्ण झाले वर टॅप करा.

इंधन किंवा ऊर्जेची सर्वाधिक बचत होईल असा मार्ग हा इंजीनच्या प्रकाराच्या आधारे वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, हायवेवर ड्राइव्ह करत असताना डिझेल वाहनाच्या बाबतीत इंधन बचतीचा लाभ हा सहसा तुलनेने सर्वाधिक असतो. हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहने थांबा आणि जा अशा शहरांमधील रहदारीच्या पॅटर्नमध्ये व डोंगराळ भागांमध्ये ड्राइव्ह करताना अधिक कार्यक्षमता देतात, जिथे त्यांना रीजनरेटिव्ह ब्रेकिंगचा फायदा होऊ शकतो.

तुम्ही इंजीनचा प्रकार निवडला नसल्यास, बहुतेक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये सर्वात सामान्य इंजीन प्रकार म्हणून गॅस किंवा पेट्रोल हे डीफॉल्ट पर्याय असतात. मोटरसायकलसाठी, सध्या फक्त गॅस इंजीन प्रकाराला सपोर्ट आहे.

तुम्हाला चालकांसाठी दिशानिर्देश मिळाल्यानंतर, तुमची पर्यावरणस्नेही राउटिंगची सेटिंग्ज बदला

  1. सर्वात वरती उजवीकडे, मेनू आणखी आणि त्यानंतर पर्याय वर टॅप करा.
  2. इंधन बचत होईल अशा मार्गांना प्राधान्य देणे सुरू किंवा बंद करा.
  3. तुमच्या गरजांशी अत्यंत चांगल्याप्रकारे जुळणारे इंजीन निवडा.
  4. पूर्ण झाले वर टॅप करा.

Google Maps ची इंधन आणि ऊर्जाकार्यक्षमतेची गणना

यूएसच्या ऊर्जा विभागाच्या नॅशनल रिन्यूएबल एनर्जी लॅबोरेटरी च्या इनसाइटनुसार आणि युरोपियन पर्यावरण संस्थेच्या डेटाच्या आधारे आम्ही ऊर्जा व इंधन कार्यक्षमतेचा अंदाज लावतो. या गणनेमध्ये तुमचा इंधन वापर आणि CO2 उत्सर्जनांवर परिणाम करणाऱ्या घटकांचा समावेश असतो, जसे की:

  • तुमच्या प्रदेशामधील वाहनांचा सरासरी इंधन किंवा ऊर्जा वापर
  • तुमच्या मार्गामधील चढाव असलेल्या टेकड्या
  • थांबा आणि जा यासारखे रहदारीचे पॅटर्न
  • रस्त्यांचे प्रकार, जसे की स्थानिक रस्ते किंवा महामार्ग

पोहोचण्यासाठी जलद मार्गाच्या आगमनाची वेळ अंदाजे समान असते, तेव्हा Maps हे इंधन किंवा ऊर्जेची सर्वाधिक बचत होईल अशा मार्गाची शिफारस करते. इंधनाची किंवा ऊर्जेची बचत खूप कमी प्रमाणात होते किंवा ड्रायव्हिंगचा वेळ लक्षणीयरीत्या वाढतो, तेव्हा तुम्हाला तुलना करण्यात मदत करण्यासाठी Maps हे मार्गांदरम्यान इंधनाची किंवा ऊर्जेची तुलनात्मक बचत दाखवते.

पर्यावरणस्नेही राउटिंगबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9300455918339303248
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false