Google Maps वरून वर्दळीच्या परिसरांची माहिती मिळवणे

आजूबाजूचा परिसर किंवा रस्ते यासारख्या ठरावीक भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त वर्दळ कधी असते, हे जाणून घेण्यासाठी Google Maps वापरा. तुम्ही या माहितीचा वापर वर्दळीचे भाग टाळण्यासाठी किंवा त्यांबद्दल जाणून घेण्यासाठी करू शकता.

मला वर्दळीचे भाग कधी दिसतील?

तुम्ही अ‍ॅप उघडल्यावर, एखाद्या भागात थोडीफार वर्दळ असते, तेव्हा Google Maps ते हायलाइट करते. "वर्दळीचा परिसर" या लेबलवर टॅप केल्याने, एक चार्ट समोर येईल जो दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी त्या परिसरात किती वर्दळ आहे हे दर्शवतो, त्यामध्ये रेस्टॉरंट, स्टोअर आणि मनोरंजनाची ठिकाणे (जसे की संग्रहालय) असलेल्या डिरेक्टरीचा समावेश असतो. एखाद्या भागातील वर्दळीच्या प्रमाणाशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला तो भाग झूम इन करावा लागू शकतो.

आम्ही एखाद्या भागामधील वर्दळीच्या प्रमाणाची गणना कशी करतो

एखाद्या भागातील वर्दळीच्या प्रमाणाची एकंदर पातळी निर्धारित करण्यासाठी, आम्ही त्या भागातील दुकाने, रेस्टॉरंट, उद्याने, कॅफे आणि यांसारख्या आणखी बऱ्याच ठिकाणांच्या वर्दळीच्या प्रमाणाचे लाइव्ह ट्रेंड एकत्र करतो. हे ट्रेंड एखाद्या परिसरात सामान्यतः किती वर्दळ आहे ते दर्शवतात आणि असा परिसर जवळपास असतो किंवा तेथे सर्वात जास्त वर्दळ असते, तेव्हा Google Maps वर आम्ही तो "वर्दळीचा परिसर" म्हणून हायलाइट करतो. आमच्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी, आमच्या सिस्टीम घर किंवा अपार्टमेंट यांसारख्या निवासी ठिकाणांच्या वर्दळीसंबंधीच्या माहितीची गणना करत नाहीत.

लोकप्रिय वेळा, प्रतीक्षा वेळा, भेटीचा कालावधी हे निर्धारित करण्यासाठी Google अशा वापरकर्त्यांकडील एकत्रित आणि अ‍ॅनोनिमाइझ केलेला डेटा वापरते, ज्यांनी Google स्थान इतिहास याची निवड केली असून तो बाय डीफॉल्ट बंद आहे. या वापरकर्त्यांनी एखाद्या व्यवसायाला पुरेश्या भेटी दिल्यास, लोकप्रिय वेळा, प्रतीक्षा वेळा आणि भेटीचा कालावधी दर्शवला जातो. तुम्ही ही माहिती मॅन्युअली तुमच्या स्थानामध्ये जोडू शकत नाही आणि Google कडे त्या व्यवसायाच्या भेटीसंबंधी पुरेसा डेटा असेल तरच ती दिसते.

वर्दळीसंबंधी डेटा तुम्हाला ओळखण्यासाठी वापरला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी, आम्ही भेददर्शी गोपनीयता वापरतो. आणि वर्दळीच्या प्रमाणाशी संबंधित अचूक, निनावी शिफारस पुरवण्यासाठी आमच्या सिस्टीमकडे पुरेशी माहिती नसल्यास, आम्ही ती प्रकाशित करत नाही—त्यामुळेच तुम्हाला कधीकधी एखाद्या भागासाठी वर्दळीच्या प्रमाणाशी संबंधित कोणतीही माहिती दिसत नाही.

आम्ही एखादा भाग कसा परिभाषित करतो

जेथे ॲक्टिव्हिटी आणि करण्यासारख्या गोष्टींचे जास्त प्रमाण असते असे व्यावसायिक परिसर Google Maps आधीपासूनच नकाशावर "स्वारस्य असलेले परिसर" म्हणून प्रदर्शित करते. परिसराच्या वर्दळीची गणना करण्यासाठी, आम्ही स्टोअर, रेस्टॉरंट, उद्याने, कॅफे आणि यांसारख्या आणखी बऱ्याच ठिकाणांचे वर्दळीसंबंधी लाइव्ह ट्रेंड एकत्रित करतो आणि त्या परिसराच्या वर्दळीची एकूण पातळी निर्धारित करतो. एखाद्या भागात थोडीफार किंवा खूप जास्त वर्दळ असते, तेव्हा आम्ही तो "वर्दळीचा भाग" म्हणून Google Maps वर हायलाइट करतो.

महत्त्वाचे:

समुदायांना सुरक्षित ठेवण्यासाठी, पुढील गोष्टींच्या समावेशासह आमच्याकडे अनके संरक्षणात्मक उपाय आहेत:

  • परिसरातील वर्दळ हे वैशिष्ट्य एखाद्या व्यक्तीचे नेमके स्थान कधीच उघड करत नाही. सर्व डेटा निनावी, सुरक्षित आणि खाजगी राहील याची खात्री करण्यासाठी आम्ही भेददर्शी गोपनीयता नावाचे प्रगत तंत्रज्ञान वापरतो.
  • आम्ही एखाद्या परिसरातील एकूण लोकांची संख्या कधीही प्रदर्शित करत नाही. त्याऐवजी, एखाद्या परिसरात त्याच्या अलीकडील वर्दळीच्या पातळ्यांच्या तुलनेत अधिक वर्दळ असते, फक्त तेव्हाच तो परिसर आम्ही हायलाइट करतो.
  • आम्ही आधी परिभाषित केलेला "स्वारस्य असलेला परिसर" येथील संपूर्ण वर्दळ प्रदर्शित करतो. हे परिसर गर्दी नेमकी कुठे आहे त्याविषयीची माहिती कधीच प्रदर्शित करत नाहीत.
  • याव्यतिरिक्त, घर किंवा अपार्टमेंट यासारख्या निवासी ठिकाणांच्या वर्दळीच्या प्रमाणाशी संबंधित डेटाची आम्ही गणना करत नाही.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15211965957861620595
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false