Google वर हवेची गुणवत्ता

सामान्य निवड

हवेच्या गुणवत्तेच्या पातळ्या कोणत्या आहेत?

देश किंवा प्रदेश हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक परिभाषित करतात आणि कच्च्या डेटाचे वर्णनात्मक रेटिंग स्केलमध्ये वर्गीकरण करतात. या निर्देशांकांमुळे प्रदूषणाची पातळी ओळखणे आणि संबंधित धोका असल्यास, तो ओळखणे सोपे होते.

स्थानिक प्रदूषण आणि आरोग्यासंबंधित विचारात घेतल्या जाणाऱ्या गोष्टींवर आधारित हवेच्या गुणवत्तेचा अहवाल देण्यासाठी वेगवेगळे देश व प्रदेश वेगवेगळ्या पातळ्या वापरतात. जगभरात डझनभर स्थानिक निर्देशांक वापरले जातात. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियातील काही राज्ये संख्येवर आधारित सिस्टीम वापरतात, तर इतर राज्ये वर्गवारीवर आधारित सिस्टीम वापरतात. युरोपियन पर्यावरण संस्था याप्रमाणे कॅनडा, यूएस आणि जपान स्वतंत्र हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक परिभाषित करतात.

जसजसे वायू प्रदूषण वाढत जाते, तसतसे सार्वजनिक आरोग्याशी संबंधित धोक्यांमध्ये वाढ होते. याचा विशेषतः लहान मुले, वृद्ध प्रौढ लोकसंख्या आणि इतर जोखीम असलेल्या लोकसंख्येवर परिणाम होतो. हवेची गुणवत्ता खराब असताना, सरकारी संस्था सामान्यतः इनडोअर आणि आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीशी संबंधित आरोग्याविषयी शिफारशी पुरवतात.

हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक कसे मोजले जातात

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) हा विविध सरकारे जनतेला हवेच्या गुणवत्तेसंबंधित माहिती देण्यासाठी निवडत असलेला मार्ग आहे. वेगवेगळ्या प्रदूषकांची पातळी ही समजण्यास सोप्या असलेल्या निर्देशांकाच्या स्वरूपात सादर करण्याचा हा मार्ग आहे.

निर्देशांकांमधील सामान्य फरकांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • प्रदूषकांची संख्या आणि प्रकार: वेगवेगळे AQIs हे वेगवेगळ्या स्वतंत्र प्रदूषकांवर आधारित असतात.
    • माग ठेवलेल्या काही सामान्य प्रदूषकांमध्ये यांचा समावेश आहे:
      • पार्टिक्युलेट मॅटर, जसे की PM2.5 आणि PM10
      • ओझोन (O3)
      • नायट्रोजन डायऑक्साइड (NO2)
      • सल्फर डायऑक्साइड (SO2)
      • कार्बन मोनॉक्साइड (CO)
    • निर्देशांकाच्या व्याख्येसाठी वेगवेगळे देश आणि प्रदेश वेगवेगळ्या प्रदूषकांचे मापन करतात. उदाहरणार्थ:
      • युरोपियन AQI हा वर नमूद केलेल्या ६ स्वतंत्र प्रदूषकांचा अहवाल देतो.
      • इंडिया AQI हा वर दिलेल्या प्रदूषकांचा आणि अमोनिया (NH3) चा अहवाल देतो.
  • सरासरी काढण्याचा कालावधी: अनेक अधिकृत स्रोत हे परिभाषित केलेल्या कालावधीसाठी सरासरी काढलेल्या रीडिंगवर आधारित अहवाल देतात. हा कालावधी १–२४ तासांचे असू शकतो.
  • प्रदूषकांच्या प्रमाणाच्या मर्यादा: वेगवेगळे AQIs हे वेगवेगळ्या प्रदूषकांच्या प्रमाणाच्या पातळ्यांना धोक्यासंबंधित त्यांचे स्वतंत्र अर्थ लागू करतात.
  • प्रमुख प्रदूषक: AQIs हे एक्स्पोजरच्या धोक्यानुसार, म्हणजेच सध्या लोकांच्या आरोग्यासाठी जो प्रदूषक सर्वात धोकादायक आहे, त्यानुसार प्रमुख प्रदूषक परिभाषित करतात. AQIs हे स्वतंत्र प्रदूषकांना वेगवेगळे अर्थ लागू करत असल्यामुळे, तुम्हाला प्रमुख प्रदूषकांच्या बाबतीत फरक दिसू शकतात.

बाहेरील प्रदूषणांचे सर्वात सामान्य प्रकार आणि त्यांचे स्रोत

हवेच्या गुणवत्तेचे स्थानिक निर्देशांक हवेतील प्रदूषकांच्या मापनांवर आधारित असतात. बाहेरील सर्वात सामान्यपणे मोजले जाणारे प्रदूषक हे आहेत:

  • पार्टिक्युलेट मॅटर (PM): हवेत आढळणारे लहान घन कण आणि द्रव थेंब. PM10 आणि PM2.5 हे १० मायक्रोमीटर आणि २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान व्यासाचे कण आहेत. हे मोटर वाहने, वूड हीटर आणि उद्योग या गोष्टी उत्सर्जित केले जाते. आगींमुळे आणि वावटळींमुळेदेखील जास्त प्रमाणात पार्टिक्युलेट मॅटर निर्माण होऊ शकते.
  • नायट्रोजन डायऑक्साइड (NO2): वायू आणि मध्य शहरातील वायू प्रदूषणाचे एक प्रमुख घटक. हे प्रामुख्याने वाहने, उद्योग, पॉवर स्टेशन आणि हीटिंगमुळे तयार होते.
  • ओझोन (O3): हा वायू स्थिरावरणामध्ये आढळतो. तो हानीकारक अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आणि तपावरणापासून आपले संरक्षण करतो. ओझान हा हानीकारक प्रदूषक सूर्यकिरणे, सेंद्रिय वायू आणि पुढील गोष्टींद्वारे रिलीझ झालेले नायट्रोजनचे ऑक्साइड यांच्यातील रासायनिक प्रतिक्रियेमुळे तयार होतो:
    • कार
    • वीज प्रकल्प
    • इतर स्रोत
  • सल्फर डायऑक्साइड (SO2): उग्र, त्रासदायक वास असलेला विषारी वायू. जीवाश्म इंधन जाळणारे इलेक्ट्रिक उद्योग, पेट्रोल रिफायनरी, सिमेंटचे उत्पादन आणि ज्वालामुखीची उत्सर्जने या सर्व गोष्टींमुळे ते तयार होऊ शकते.
  • कार्बन मोनॉक्साइड (CO): मोटर वाहने किंवा मशीनमधून तयार झालेला वायू.

हे सर्व प्रदूषक उच्च प्रमाणात आढळतात, तेव्हा त्यांचा आरोग्यावर परिणाम होतो. याबद्दल जागतिक आरोग्य संघटना (WHO) वेबसाइट मध्ये अधिक जाणून घ्या.

हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणे

गुंतागुंतीची असली, तरीही हवेच्या गुणवत्तेवर अनेक घटकांचा परिणाम होतो:

  • वाऱ्याचा वेग आणि दिशा व इतरांमधील तुलनात्मक आर्द्रता यांसारख्या हवामानाच्या स्थिती.
  • सौर किरणन
  • वणवे आणि इतर प्रकारच्या आगी
  • शेतीच्या कामामुळे येणार्‍या वावटळी आणि धुळीची उत्सर्जने
  • उद्योग आणि खाजगी घरांमधून होणारी उत्सर्जने
  • रहदारीमुळे होणारी उत्सर्जने
  • वातावरणातील इतर भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया

स्टेशनवर आधारित उपायाशी संबंधित

तुमच्या जवळपासचा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) कसा निवडला जातो

हवेच्या गुणवत्तेच्या पातळ्यांची गणना ही हवेच्या गुणवत्तेसंबंधित स्टेशनच्या मापनांच्या आधारे केली जाते. हवेच्या गुणवत्तेसंबंधित माहितीबाबत सर्वसमावेशक दृष्टिकोन मिळावा, यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या भागामधील सर्व स्टेशनचा नकाशा देतो. मात्र, स्टेशनदरम्यानची हवेची गुणवत्ता बदलू शकते आणि तुमच्या सर्वात जवळच्या स्टेशनवरील AQI पातळी ही तुमच्या विशिष्ट स्थानावरील AQI ची पातळी दाखवेलच असे नाही. गोंधळ टाळण्यासाठी, तुमच्या जवळपासच्या स्टेशनवरील AQI पातळी प्रदर्शित करण्यासाठी आम्ही नकाशावर आधारित दृश्य दाखवतो.

जागेच्या मर्यादांमुळे, अनेक Google उत्पादने एकाच स्टेशनचे रीडिंग दाखवतात. अशा बाबतीमध्ये, तुमच्या स्थानाच्या सर्वात जवळच्या स्टेशनमधील मापनानुसार AQI मूल्य निवडले जाते.

महत्त्वाचे:

  • प्रदूषकाची प्रमाणे थोड्या अंतराने बदलू शकतात आणि त्यामुळे तुमच्या व स्टेशनच्या स्थानादरम्यान हवेच्या गुणवत्तेची रीडिंग मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.
  • काही बाबतींमध्ये हवेच्या गुणवत्तेसंबंधित डेटा देण्यात थोडा विलंब होऊ शकतो (१२ तास), जो हवेची गुणवत्ता झपाट्याने बदलत असेल, तेव्हा जाणवू शकतो.
  • प्रत्येक मॉनिटरिंग स्टेशन प्रत्येक प्रदूषकाचे मापन करेलच असे नाही. कधीकधी या फरकामुळे, नोंदवलेल्या AQI मध्ये विसंगती निर्माण होऊ शकते, जो स्टेशनशी संबंधित असतो आणि फक्त त्या स्टेशनवर मोजलेले प्रदूषक व हवेची वास्तविक गुणवत्ता दाखवतो.
  • इतर डेटा स्रोतांच्या बाबतीत AQI ची काळानुसार सरासरी काढल्यामुळेदेखील विसंगती निर्माण होऊ शकते, विशेषतः उच्च प्रदूषण असलेल्या घटनांच्या सुरुवातीला आणि शेवटी.

धुराचे लोट म्हणजे काय?

महत्त्वाचे: आजच्या धुराचे अजूनही विश्लेषण केले जात असताना नकाशा कालचा धूर दर्शवू शकतो. काही प्रकरणांमध्ये, धुराचा लोट असताना AQI चांगला असू शकतो. हे अशा प्रकरणांमध्ये होऊ शकते, जेव्हा धुराचा लोट जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचत नाही आणि मोजलेल्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करत नाही.

यूएसमधील धुराविषयीची अतिरिक्त माहिती ही NOAA कडून मिळणाऱ्या उपग्रहांच्या डेटाच्या आधारे पुरवली जात असून, ती Google Search आणि Maps वर उपलब्ध आहे.

डेटामध्ये मध्यम आणि उच्च पातळीच्या धुराची घनता समाविष्ट आहे. डेटा उपलब्ध असल्यास, हवेच्या गुणवत्तेच्या नकाशावर धुराचे लोट दाखवले जातील.

 

हवेच्या गुणवत्तेशी संबंधित डेटा स्रोत

हवेशी संबंधित Google उत्पादनांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी, आम्ही या स्रोतांकडील थेट मॉनिटरिंग स्टेशनचा डेटा दाखवतो:

ऑस्ट्रेलिया

ब्राझील

चिली

भारत

इस्रायल

मेक्सिको

सिंगापूर

दक्षिण कोरिया

युनायटेड स्टेट्स

मॉडेलवर आधारित उपायाशी संबंधित

तुमच्या जवळपासच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) यांची निवड

तुमच्या स्थानाजवळील हवेची गुणवत्ता दाखवण्यासाठी, Google हे त्याचे हवेची गुणवत्ता मॉडेल लागू करते.
तुम्ही एखाद्या शहरासाठी हवेची गुणवत्ता पाहत असल्यास, जसे की “लंडनमधील हवामान”, परिणाम म्हणून दिसणारे हवेच्या गुणवत्तेशी संबंधित रीडिंग हे तुमच्यापासून दूर असलेल्या स्थानाचे असू शकते, जसे की शहराचा मध्यवर्ती भाग. तुम्ही त्याच शहरात असलात, तरीही हे तुमच्या आजूबाजूची परिस्थिती अचूकपणे दर्शवणार नाही.

तुमच्या स्थानासाठी AQI मिळवण्यासाठी:

  1. Google Maps मध्ये साइन इन करा.
  2. स्थान हेडरवर, भाग निवडा निवडा.
  3. अचूक स्थान वापरण्यासाठी, स्थान बदला.

Google च्या हवेची गुणवत्ता मॉडेलचा डेटा स्रोत आणि त्याची अचूकता

आम्ही बहुस्तरीय पद्धतीवर आधारित फ्यूजन पद्धत म्हणून ओळखले जाणारे हवेची गुणवत्ता मॉडेल वापरतो. ही पद्धत विविध इनपुट स्रोतांकडील डेटा एकत्रित करते आणि अत्याधुनिक पद्धती वापरून स्तरांचे महत्त्व निर्धारित करते. इनपुट स्तर हे:

  • सरकारी रेफरन्स मॉनिटरिंग स्टेशन
  • व्यावसायिक सेन्सर नेटवर्क
  • जागतिक आणि प्रादेशिक वितरण मॉडेल
  • आगीचा धूर व धुळीशी संबंधित मॉडेल
  • उपग्रह माहिती
  • रहदारीशी संबंधित डेटा
  • जमिनीने व्यापलेला भाग यासारखी सहाय्यक माहिती
  • हवामानशास्त्र

Google चे मॉडेल हे वरती नमूद केलेल्या सर्वात सामान्य प्रदूषकाच्या प्रमाणांच्या आधारे हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक पुरवते, ज्यामध्ये NO, NOx आणि काही बाबतींमध्ये नॉन-मिथेन हायड्रो कार्बन (NMHC) चा समावेश असतो. ५०० मी × ५०० मी ग्रिडवर या मॉडेलची गणना केली जाते.

सरकारी किंवा रेफरन्स मॉनिटरिंग स्टेशनवरील प्रदूषकाशी संबंधित डेटा हा मॉडेलमधील मूलभूत स्तर आणि सर्वात विश्वसनीय माहिती असते. कोणतीही अनियमित मूल्ये काढून टाकण्यासाठी आणि डेटाच्या उच्च गुणवत्तेची खात्री करण्यासाठी, हे मॉडेल जगभरातील मॉनिटरवरून गोळा केलेल्या मापनांच्या बाबतीत क्वालिटी अश्युरन्सची प्रक्रिया करते. मापनाची वेळ आणि त्याचे प्रकाशन यांदरम्यान लक्षणीय विलंब असल्यास, सद्य अंदाज मांडणारा अल्गोरिदम सद्य तासासाठी प्रदूषकाच्या प्रमाणांची गणना करतो.

मॉडेलच्या मर्यादा

Google च्या मॉडेलने वापरलेल्या प्रत्येक माहितीच्या स्तराशी संबंधित एरर असल्या, तरीही आमची पद्धत ही एकूण एरर लक्षणीयरीत्या कमी करते, कारण हे मॉडेल विविध स्रोतांदरम्यान क्रॉस व्हॅलिडेशन करते. तथापि, प्रत्येक मॉडेलमध्ये पुढीलप्रमाणे समस्या असू शकतात:

  • काही बाबतींमध्ये हवेच्या गुणवत्तेशी संबंधित डेटामधील थोडा विलंब (१–२ तास).
  • स्थानिक इव्‍हेंट, जसे की बार्बेक्यू किंवा आग लागलेले घर, जे मॉडेल डिटेक्ट करत नाही.
  • काही बाबतींमध्ये, हे मॉडेल तुमच्या स्थानापासून काही मैलांवर धूर असल्याचे दाखवू शकते.
    • आगीच्या धुरामुळे मेक्सिको आणि कॅनडामध्ये वापरकर्त्यांना विशिष्ट कालावधीदरम्यान AQ शी संबंधित डेटा मिळण्यास उशीर होऊ शकतो.

Google आणि मॉनिटरिंग स्टेशनवरील वेगळे AQI मूल्य

या कारणांमुळे सरकारी मॉनिटरिंग स्टेशन आणि Google वरील हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाच्या मूल्यांमध्ये फरक असू शकतात:

  • सर्व सरकारी स्टेशन सर्व प्रकारचे प्रदूषक मोजत नाहीत.
  • सरकारी मॉनिटरिंग स्टेशनवरील डेटाच्या बाबतीत बरेचदा अहवाल देताना विलंब होत असल्यामुळे, हवेच्या गुणवत्तेमध्ये अचानक होणारे बदल सुटू शकतात.
  • सरकारी मॉनिटरिंग स्टेशन फक्त स्टेशनच्या स्थानावरील घटनांचे मापन करते.

उदाहरणार्थ २, Google चे मॉडेल एकाहून अधिक डेटा स्रोत विचारात घेते आणि सहाही प्रदूषकांच्या बाबतीत स्टेशनच्या स्थानावरील हवेच्या गुणवत्तेचा रीअल टाइम अंदाज लावते:

  • जमिनीच्या पातळीवरील ओझोन (O3)
  • PM2.5
  • PM10 यासारख्या धुळीशी संबंधित घटना
  • कार्बन मोनॉक्साइड (CO)
  • सल्फर डायऑक्साइड (SO2)
  • ५०० मी ग्रिडच्या रेझोल्यूशनमधील नायट्रोजन डायऑक्साइड (NO2)

उदाहरण १: धुळीशी संबंधित घटना (PM10) यादरम्यान, मॉनिटरिंग स्टेशन हे हवेची चांगली गुणवत्ता दाखवेल, कारण ते फक्त जमिनीच्या पातळीवरील ओझोन (O3) याचे मापन करते. मात्र, Google चे मॉडेल हे हवेची खराब गुणवत्ता दाखवेल, कारण त्यामध्ये PM10 चा समावेश आहे.

उदाहरण २: मॉनिटरिंग स्टेशन हे सर्व प्रदूषकांची गणना करते, Google आणि स्टेशनवर समान प्रमुख प्रदूषक, जसे की ओझोन दाखवला जातो, मात्र Google हे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक २०० दाखवते, तर स्टेशन १५० दाखवते. याचे कारण म्हणजे, ओझोन हा दिवसभर बदलत असल्यामुळे, २ तासांपूर्वी केलेले मापन हे Google च्या रीअल-टाइम अंदाजासारखे असू शकत नाही.

Google दाखवत असलेली हवेची गुणवत्ता ही माझ्या (किंवा सर्वात जवळच्या) व्यावसायिक सेन्सरवर दिसणाऱ्या गुणवत्तेशी जुळत नाही. याचे कारण काय आहे?

नोंदवलेल्या प्रदूषकांची संख्या

व्यावसायिकरीत्या उपलब्ध असलेले बहुतांश सेन्सर फक्त PM2.5 आणि PM10 बद्दल अहवाल देतात, तर Google हे एकाहून अधिक प्रदूषकांच्या आधारावर हवेच्या गुणवत्तेचा अहवाल देते, ज्यांमध्ये जमिनीच्या पातळीवरील ओझोन (O3), PM2.5, PM10, कार्बन मोनॉक्साइड (CO), सल्फर डायऑक्साइड (SO2) व नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) यांचा समावेश आहे. बहुतांश व्यावसायिक सेन्सरमध्ये, मोठ्या कणांच्या बाबतीत क्षमता कमी होत जाते, म्हणजेच या सेन्सरमध्ये वापरलेल्या ऑप्टिकल पद्धतीच्या मर्यादेमुळे PM10 च्या मापनाबद्दलची विश्वसनीयता खूप कमी असू शकते.

पर्यावरणाशी संबंधित घटक

पर्यावरणाशी संबंधित बाह्य घटक, जसे की तुलनेने उच्च आर्द्रता आणि तापमान, या गोष्टींमुळे व्यावसायिक ऑप्टिकल सेन्सरच्या रीडिंगवर परिणाम होऊ शकतो.

सेन्सरच्या स्थानाचादेखील रीडिंगवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो, कारण त्यांच्यावर स्थानिक प्रदूषणाचा परिणाम होऊ शकतो, जे व्यापक भागाचे प्रतिनिधित्व करत नाही.

आमचे मॉडेल हे व्यावसायिक सेन्सरच्या रीडिंगचा समावेश करते आणि चुकीची मापने ओळखून ती काढून टाकते.

समाविष्ट असलेली रूपांतराची प्रक्रिया

व्यावसायिक सेन्सर बरेचदा PM2.5 च्या मापनासाठी “मोजणीवर आधारित” पद्धत वापरतात, तर हवेच्या गुणवत्तेच्या माहितीचा अहवाल देण्यासाठी वापरला जाणारा मानक फॉरमॅट हा “वस्तुमानावर आधारित” असतो.

सरकारी मॉनिटरिंग स्टेशन आणि Google चे मॉडेल बाय डीफॉल्ट “प्रति घनता वस्तुमान” यानुसार अहवाल देते. या रूपांतरासाठी धूर किंवा धूळ यांसारख्या कणांची घनता आवश्यक असते. या रूपांतरामुळे, सरकारी मॉनिटर आणि Google च्या मॉडेलशी तुलना केल्यावर, मोठ्या प्रमाणावर फरक दिसू शकतो.

सरासरी काढण्यासाठीचा कालावधी

वेगवेगळे व्यावसायिक सेन्सर नेटवर्क पुरवठादार वेगवेगळे सरासरी कालावधी वापरून डेटा दाखवतात. Google हे दर तासाला प्रदूषकांचे प्रमाण आणि AQIs ची गणना करत असते. प्रत्येक AQI ला देशानुसार त्याचा सरासरी काढण्यासाठीचा स्वतंत्र कालावधी असतो, जो सहसा किमान दर तासाला मोजलेला असतो, बरेचदा एकाहून अधिक तासांचा समावेश असतो. उदाहरणार्थ, धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये अचानक वाढ झाल्यास, व्यावसायिक सेन्सर पुरवठादाराच्या वेबसाइटवर तुम्हाला १० मिनिटांच्या सरासरीच्या आधारे हवेची खराब गुणवत्ता दिसू शकते, तर Google हे दर तासाची सरासरी जी या बाबतीमध्ये आधीच्या तासांच्या कमी प्रदूषणामुळे कमी असू शकते आणि आरोग्यावरील परिणाम दर्शवणारे आणखी दीर्घकालीन सरासरींवर आधारित असणारे अधिकृत AQI मूल्य दाखवेल.

टीप: व्यावसायिक सेन्सर नेटवर्कचा आमच्या मॉडेलमध्ये समावेश नाही आणि ते वेगळे परिणाम दाखवू शकते.

Google चा हवेच्या गुणवत्तेशी संबंधित डेटा हा इतर पुरवठादारांपेक्षा वेगळा आहे

हवेच्या गुणवत्तेचे वेगवेगळे निर्देशांक

वेगवेगळे देश आणि प्रदेश हे वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या स्केलवर आधारित हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक वापरतात. तुम्हाला पुरवठादारांची तुलना करायची असल्यास, समान “हवेच्या गुणवत्तेशी संबंधित भाषा” वापरत असलेल्या अहवालांची तुम्ही तुलना करत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

उदाहरणार्थ, काही पुरवठादार हे प्रति तासानुसार यूएस AQI वापरतात, तर इतर पुरवठादार संच स्वरूपात यूएस AQI वापरतात, जसे की २४ तासांच्या कालावधीदरम्यानची PM2.5 ची सरासरी काढणे किंवा ते AirNow निर्देशांक वापरतात.

अहवाल देण्याच्या आणि मापनाच्या वेगवेगळ्या पद्धती

विविध पुरवठादार हवेच्या गुणवत्तेचे मापन कसे करतात यामध्ये फरक असल्यामुळे, अंतिम परिणामांमध्ये फरक पडतो.

काही बाबतींमध्ये, हवेच्या गुणवत्तेसंबंधित डेटा हा मापनांवर आधारित असतो. काही पुरवठादार व्यावसायिक सेन्सर वापरतात आणि इतर पुरवठादार मॉडेल वापरतात.

Google हे पुढील गोष्टींसोबत जगभरातील मॉनिटरिंग स्टेशनची माहिती एकत्रित करते:

  • व्यावसायिक सेन्सरची माहिती
  • उपग्रह डेटा
  • हवामानाशी संबंधित पॅटर्न
  • रहदारीच्या स्थितीशी संबंधित अहवाल
  • वणवा
  • जमिनीशी संबंधित माहिती

हवेच्या गुणवत्तेशी संबंधित अहवाल देताना, वेगवेगळे पुरवठादार वेगवेगळा कावालधी वापरू शकतात, त्यामुळे त्याच स्थानावरील वेगवेगळ्या पुरवठादारांच्या बाबतीत प्रदूषकाच्या किंवा निर्देशांकाच्या अहवाल दिलेल्या मूल्यांमध्ये वेळेनुसार विलंब दिसू शकतो.

प्रदूषक उपस्थित आहे, पण Google हवेची गुणवत्ता चांगली दाखवते

कधीकधी, तुम्हाला Google वर दिसणारी हवेच्या गुणवत्तेशी संबंधित माहिती ही तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे दिसत आहे किंवा जो वास येत आहे त्याच्याशी विसंगत दिसू शकते. यासाठी सामान्यतः अनेक कारणे असतात:

  • नाक विशेषतः वासाच्या बाबतीत संवेदनशील असते. आरोग्याच्या दृष्टीने हवेची गुणवत्ता पुरेशी सुरक्षित असल्याचे मानले जात असले, तरीही तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या प्रदूषणाचा वास येण्याची शक्यता आहे, जसे की धुरामधील खूप कमी प्रमाणातील वायू. अस्थिर सेंद्रिय संयुगे (VOCs) यांद्वारे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे लक्षात येण्यासारखे वास निर्माण होऊ शकतात, पण सरकारी मॉनिटरिंग स्टेशन त्यांचे मापन करत नाही किंवा हवेच्या गुणवत्तेसंबंधित आमच्या अहवालामध्ये त्यांचा समावेश केला जात नाही.
  • दृश्यमानतेवर परिणाम करणारा धूर हा जमिनीच्या पातळीवर डिटेक्ट करता येण्यायोग्य नसला, तरीही तो बरेचदा उंच स्थानांवर दिसू शकतो.

Google च्या मॉडेलच्या मर्यादेबद्दल अधिक जाणून घ्या.

Google हे हवेची वाईट गुणवत्ता दाखवते, पण सर्वकाही स्पष्ट आहे

वावटळी किंवा वणव्याचा धूर यांसारखे प्रदूषणाचे काही प्रकार दिसू शकत असले, तरीही बहुतांशी वायू प्रदूषण हे उपकरणाशिवाय पाहता येत नाही. फक्त बाहेर पाहून दिसणारे सूर्यप्रकाशित, पावसाळी किंवा वादळी हवामान आणि वायू प्रदूषण यांच्यामधील हा एक मूलभूत फरक आहे.

उदाहरणार्थ, तयार होण्यासाठी ज्यांना सूर्यप्रकाश लागतो अशा ओझोनच्या उच्च पातळ्या किंवा ज्यांना एरवी “ब्यूटिफुल डे” इफेक्ट म्हणून ओळखले जाते या उच्च स्थानांवर जसे, की डोंगर माथ्यावर अथवा निरभ्र आकाश आणि सूर्यप्रकाश असणाऱ्या दिवशी तयार होऊ शकतात.

हवेच्या गुणवत्तेशी संबंधित मदत मध्ये वर्णन केलेली मॉडेलची मर्यादा हे आणखी एक कारण असू शकते.

Google हे युनायटेड स्टेट्सच्या AirNow पेक्षा वेगळा अहवाल देते

AirNow ची मुख्य वेबसाइट आणि AirNow चा आग व धुराशी संबंधित नकाशा हे हवेच्या गुणवत्तेच्या माहितीसाठी युनायटेड स्टेट्समधील सर्वात लोकप्रिय अधिकृत स्रोतांपैकी दोन स्रोत आहेत.


AirNow आणि Google चे हवेच्या गुणवत्तेसाठीचे अहवाल यांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत:

  • निरीक्षण केलेल्या प्रदूषकांची संख्या: Google हे यूएस EPA सह यूएस EPA नुसार अलाइन केले आहे आणि AirNow हे वेबसाइटवर दाखवत असलेल्या प्रदूषकांपेक्षा जास्त प्रदूषक कव्हर करते.
  • Google जास्त डेटा स्रोत वापरते.
  • AirNow च्या संपूर्ण भागातील सर्वात वाईट अहवालाच्या तुलनेमध्ये Google हे अत्यंत स्थानिक पातळीवरील माहितीचा अहवाल देते.
  • Google आणि Air Now यांचा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) यामध्ये फरक आहेत.
  AirNow AirNow चा आग आणि धुराशी संबंधित नकाशा Google
डेटा स्रोत आणि पद्धती

प्रदेशामधील सर्वात वाईट रीडिंगवर आधारित मॉनिटरिंग स्टेशन आणि इंटरपोलेशन मॉडेल

  • मॉनिटरिंग स्टेशन आणि व्यावसायिक सेन्सर
  • वणव्याच्या धुराविषयी अहवाल देण्यासाठी मॉडेलिंग लागू केले जाते

विविध इनपुट डेटा, मॉडेल आणि काळासंबंधित व जागेसंबंधित पूर्वानुमान मांडणारे वेगवेगळे अल्गोरिदम:

  • मॉनिटरिंग स्टेशन
  • व्यावसायिक सेन्सर
  • उपग्रह डेटा
  • हवामानाशी संबंधित पॅटर्न
  • रहदारीची स्थिती
  • वणव्याचा माग ठेवणे
  • जमिनीविषयी माहिती
निरीक्षण केले जाणारे प्रदूषक
  • जमिनीच्या पातळीवरील ओझोन (O3) (NowCast)
  • पार्टिक्युलेट मॅटर (PM2.5)(NowCast)
  • पार्टिक्युलेट मॅटर (PM10)(NowCast)
  • कार्बन मोनॉक्साइड (CO)
  • सल्फर डायऑक्साइड (SO2)
  • नायट्रोजन डायऑक्साइड (NO2)
पार्टिक्युलेट मॅटर (PM2.5)
  • जमिनीच्या पातळीवरील ओझोन (O3)
  • पार्टिक्युलेट मॅटर (PM2.5)
  • पार्टिक्युलेट मॅटर (PM10)
  • कार्बन मोनॉक्साइड (CO)
  • सल्फर डायऑक्साइड (SO2)
  • नायट्रोजन डायऑक्साइड (NO2)

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) याची गणना करण्यासाठी यूएसचे दोन अधिकृत मार्ग आहेत:

  • यूएस EPA चा AQI दीर्घ कालावधीसाठी एक्स्पोजरची गणना करतो आणि सहा प्रदूषकांचा समावेश करतो. खालील सारणी पहा.
  • NowCast, जे कोणत्याही तासाला संपूर्ण दैनिक AQI चा अंदाज लावण्यासाठी वापरले जाते. आवश्यक असेल तेव्हा आणि लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने कृती करता यावी म्हणून, त्यांना बाहेरील अ‍ॅक्टिव्हिटी व एक्स्पोजर कमी करता यावे, यासाठी ते सध्याच्या परिस्थितीसंबंधित माहिती पुरवते. लोकांना जे दिसत आहे किंवा ते जे अनुभवत आहेत, त्यानुसार NowCast हे सध्याच्या स्थितीच्या नकाशाला आणखी चांगल्या प्रकारे अलाइन होऊ देते. ओझोन, PM2.5 आणि PM10 यांच्या बाबतीत आणखी नियमितपणे माहिती पुरवण्यासाठी हे वापरले जाते.

यूएसमध्ये AQI चा अहवाल देताना Google हे दोन निर्देशांक एकत्र करते.

अधिकृत यूएसए AQIs आणि Google ची तुलना करणे

वेगवेगळ्या यूएस AQI मार्गांचे तपशीलवार ब्रेकडाउन येथे दिले आहे, जेणेकरून तुम्हाला शेजारी-शेजारी त्यांची तुलना करता येईल:

  यूएस AQI AirNow NowCast Google हायब्रिड यूएस AQI
प्रदूषकांची संख्या

६ प्रदूषक

  • जमिनीच्या पातळीवरील ओझोन (O3)
  • पार्टिक्युलेट मॅटर २.५ मायक्रोमीटर (PM2.5)
  • पार्टिक्युलेट मॅटर १० मायक्रोमीटर (PM10)
  • कार्बन मोनॉक्साइड (CO)
  • सल्फर डायऑक्साइड (SO2)
  • नायट्रोजन डायऑक्साइड (NO2)

३ प्रदूषक

  • जमिनीच्या पातळीवरील ओझोन (O3)
  • पार्टिक्युलेट मॅटर २.५ मायक्रोमीटर (PM2.5)
  • पार्टिक्युलेट मॅटर १० मायक्रोमीटर (PM10)

६ प्रदूषक

  • जमिनीच्या पातळीवरील ओझोन (O3)
  • पार्टिक्युलेट मॅटर २.५ मायक्रोमीटर (PM2.5)
  • पार्टिक्युलेट मॅटर १० मायक्रोमीटर (PM10)
  • कार्बन मोनॉक्साइड (CO)
  • सल्फर डायऑक्साइड (SO2)
  • नायट्रोजन डायऑक्साइड (NO2)

लक्षात घेतलेले कालावधी

कव्हर केलेला सरासरी कालावधी हा प्रदूषकानुसार वेगवेगळा असतो: उदा., ओझोनची गणना ही ८ तासांच्या सरासरी एक्स्पोजर पातळ्यांनुसार, तसेच १ तासाच्या एक्स्पोजर रेंजनुसार केली जाते.

PM2.5 चा अहवाल २४ तासांच्या एक्स्पोजरच्या सरासरींवर आधारित असतो.

AirNow NowCast ची सरासरी काढण्याची पद्धत ही आगी किंवा वावटळींमुळे वायू प्रदूषणाच्या पातळ्यांमध्ये अचानक होणारे बदल आणखी चांगल्या प्रकारे दर्शवण्यासाठी अलीकडील तासांना अधिक महत्त्व देते.

यूएस AQI च्या तुलनेमध्ये छोटे सरासरी कालावधी, उदा. मागील १२ तासांचा कालावधी गृहीत धरणे.

Google हे पार्टिक्युलेट मॅटर (PM10 आणि PM2.5) यासाठी AirNow NowCast ची सरासरी काढण्याची पद्धत वापरते, ज्यामध्ये अलीकडील तासांना व अचानक होणाऱ्या बदलांना अधिक महत्त्व दिले जाते.

पण, आम्ही NowCast पेक्षा जास्त प्रदूषकांबद्दलदेखील अहवाल देतो: Google हे इतर प्रदूषकांची सरासरी काढते: O3, NO2, SO2, CO, गणना रन करते, त्यानंतर याचे यूएस AQI फॉरमॅटमध्ये रूपांतर करते.

हवेच्या गुणवत्तेशी संबंधित डेटा स्रोत

आम्ही हवेच्या गुणवत्तेशी संबंधित Google च्या मॉडेलसाठी ज्यांवरून माहिती गोळा करतो ते स्रोत येथे दिले आहेत:

जागतिक डेटा स्रोत

बेल्जियम

  • फेरबदल केलेली IRCEL - CELINE शी संबंधित माहिती. परवाना.

कॅनडा

डेन्मार्क

  • DCE - National Center for Miljø og Energi. हा कच्चा डेटा आहे, ज्याची गुणवत्ता नियंत्रित केलेली नाही.

फिनलंड

फ्रान्स

जर्मनी

गर्न्सी

इटली

आयर्लंड

जपान

  • Soramame कडील फेरबदल केलेली माहिती.

मेक्सिको

  • एअर क्वालिटी मॉनिटरिंग डिरेक्टोरेट ऑफ जनरल डिरेक्टोरेट ऑफ एअर क्वालिटी (SEDEMA) याद्वारे ऑपरेट आणि व्यवस्थापित केले जाणारे वातावरणीय मॉनिटरिंग नेटवर्क व मेक्सिको खोऱ्याच्या मेट्रोपॉलिटन क्षेत्रातील त्याच्या मॉनिटरिंग स्टेशनकडून मिळालेली माहिती वापरून हवेची गुणवत्ता याच्याशी संबंधित इन्व्हाइरमेंट सेक्रेटेरिअट ऑफ द गव्‍हर्नमेंट ऑफ मेक्सिको सिटी ने प्रकाशित केलेली माहिती तयार केली जाते. ही माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहे आणि गुणवत्तेशी संबंधित प्रक्रियांच्या अधीन आहे, ज्यांद्वारे त्यामध्ये फेरबदल केले जाऊ शकतात. तृतीय पक्षांनी या माहितीचा केलेला प्रसार किंवा वापर हा ती प्रकाशित करणाऱ्या अथवा वापरणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे.
  • SINAICA, https://sinaica.inecc.gob.mx/. बदल केले गेले होते.

स्पेन

स्वीडन

  • SMHI कडील फेरबदल केलेल्या माहितीचा समावेश आहे.

युनायटेड किंगडम

युनायटेड स्टेट्स

  • टेक्सास TCEQ.
  • न्यूयॉर्क स्टेट, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हाइरमेंटल कंझर्वेशन: येथे दाखवलेला डेटा हा http://www.nyaqinow.net वरून मिळवलेला आहे, जो प्राथमिक असून बदलाच्या अधीन आहे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12365892457634100419
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false