नेव्हिगेशन डेटा Maps सर्वांसाठी आणखी चांगले कसे बनवतो

नेव्हिगेशन हे नेव्हिगेशन डेटाद्वारे प्रायोजित आहे, जे Google Maps ला प्रत्येकासाठी अधिक उपयुक्त बनवते. तुम्ही पुढीलप्रमाणे वैशिष्ट्ये वापरता, तेव्हा हा डेटा गोळा केला जातो:

  • टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन
  • एका नजरेत दिसणारे दिशानिर्देश, जे थेट तुमच्या मार्गाचे अवलोकन किंवा लॉक स्क्रीनवरून तुम्हाला अपडेट केलेले ETAs आणि तुम्ही तुमच्या मार्गावरून जात असताना तुमचे पुढील वळण या गोष्टी आपोआप पाहू देते. तुम्ही सेटिंग्ज सेटिंग्ज ला भेट देऊन किंवा निळ्या बिंदूवर टॅप करून एका नजरेत दिसणारे दिशानिर्देश बंद करू शकता.

नेव्हिगेशन डेटाने Google Maps ला, रहदारीची स्थिती, व्यत्यय आणि पोहोचण्यासाठीचा जलद मार्ग शोधण्याची क्षमता, अशी रीअल-टाइम वैशिष्ट्ये पुरवण्यात नेहमी मदत केली आहे — व यापुढेही मदत करत राहील.

नेव्हिगेशन डेटा कशाप्रकारे काम करतो

तुम्ही Google Maps वापरून नेव्हिगेट करताना, प्रत्येकासाठी रीअल टाइम मध्ये जग दाखवण्याकरिता मदत करण्यासाठी Google डेटा गोळा करते. डेटा, जसे की:

  • GPS स्थान
  • तुम्ही निवडलेला मार्ग यांसारखे नेव्हिगेशनशी संबंधित तपशील
  • बॅरोमीटर यासारखा तुमच्या डिव्हाइसकडून येणारा सेन्सर डेटा

Maps ला आणखी चांगले बनवण्यासाठी, Google तुमचा डेटा स्वतः वापरते किंवा इतरांसोबत एकत्रित करते, जसे की:

  • नेव्हिगेशनमध्ये सुधारणा करत आहे
  • वेळ वाचवण्यासाठी आणखी जलद पर्यायी मार्ग सुचवत आहे
  • रहदारी, व्यत्यय आणि हवामानाची स्थिती यांसारखी रीअल-टाइम अपडेट दाखवत आहे

Google नेव्हिगेशन डेटा गोळा करणे सुरू करते:

  • टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी: तुम्ही सुरू करा Start वर टॅप केल्यानंतर, लगेच.
  • एका नजरेत दिसणाऱ्या दिशानिर्देशांसाठी: Maps उघडे असताना, तुम्ही तुमच्या मार्गावरून पुढे जाण्यास सुरुवात केल्यानंतर, लगेच.

Google नेव्हिगेशन डेटा गोळा करणे थांबवते: 

  • टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी: तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर. तुम्ही बाहेर पडा किंवा बंद करा बंद करा वर टॅप करूनदेखील नेव्हिगेशन थांबवू शकता.
  • एका नजरेत दिसणाऱ्या दिशानिर्देशांसाठी: तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर. तुम्ही मागे जा Back वरदेखील टॅप करू शकता.

Google चे गोपनीयता धोरण यानुसार तुमचा डेटा कसा गोळा केला जातो आणि वापरला जातो याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google नेव्हिगेशनसंबंधित डेटाचे संरक्षण कसे करते

  • तुम्ही कोणता मार्ग निवडलात, यासारखा नेव्हिगेशनशी संबंधित डेटा तुमच्या Google खाते शी संलग्न नाही. त्याऐवजी तो नियमित रीसेट केल्या जाणाऱ्या, सुरक्षितपणे जनरेट केलेल्या आयडेंटिफायरशी संलग्न असतो. याचा अर्थ असा, की Google हे तुमच्या Google खाते च्या आधारावर तुमचा नेव्हिगेशनशी संबंधित डेटा पाहू शकत नाही.
  • तुम्ही जग एक्सप्लोर करता, तेव्हा गोळा केलेला इतर डेटा, जसे की तुम्ही एखाद्या ठिकाणाचे दिशानिर्देश शोधता, तेव्हा तो डेटा तुमच्या Google खाते शी संबंधित असू शकताे. तुम्ही Maps मधील तुमचा डेटा ला भेट देऊन नियंत्रणे बदलू शकता व स्थान इतिहास किंवा वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यासारखी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करू शकता.
  • आम्ही सर्वांना सर्वोत्कृष्ट Maps अनुभव देण्यासाठी आवश्यक असलेला फक्त नेव्हिगेशन डेटा गोळा करतो—त्यावर प्रक्रिया केल्यानंतर तो हटवला जातो.
  • आम्ही तुमच्या Google खाते किंवा डिव्हाइससोबत असलेल्या नकाशाशी अपडेट संलग्न करत नाही.

Google तुमची माहिती कशी सुरक्षित ठेवते, याबद्दल अधिक जाणून घ्या.

नियंत्रण तुमच्याकडे आहे

तुम्ही Google Maps मध्ये स्थानाशी संबंधित परवानगी बदलू शकता. तुम्हाला माहीत असावे म्हणून, तुम्ही स्थान परवानगी नाकारल्यास, हे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखी रीअल-टाइम स्थान वापरणारी वैशिष्ट्ये बंद करेल. तुम्हाला तरीही दिशानिर्देशांची सूची आणि मार्गाचे पूर्वावलोकन मिळवता येईल.
Maps साठी स्थान परवानगी बदलण्याकरिता:
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps पहा.
  2. Google Maps ॲपला Maps स्‍पर्श करून धरून ठेवा.
  3. अ‍ॅपसंबंधित माहिती  आणि त्यानंतर परवानग्या आणि त्यानंतर स्थान वर टॅप करा.
  4. पर्यायावर टॅप करा:
    • नेहमी अनुमती द्या: अ‍ॅप हे तुमचे स्थान कधीही पाहू शकते.
    • फक्त अ‍ॅप वापरताना: तुम्ही अ‍ॅप वापरत असता, तेव्हाच तुमचे स्थान अ‍ॅक्सेस करू शकते.
    • प्रत्येक वेळी विचारा:प्रत्येक वेळी तुम्ही अ‍ॅप उघडता तेव्हा ते तुमचे स्थान वापरण्यासाठी विचारेल. तुम्ही अ‍ॅप बंद करत नाही, तोपर्यंत तुमचे स्थान वापरले जाऊ शकते.
    • नाकारा: तुम्ही अ‍ॅप वापरत असता, तेव्हादेखील ते तुमचे स्थान वापरू शकत नाही.

तुम्ही एका नजरेत दिसणारे दिशानिर्देशदेखील कधीही बंद करू शकता:

  1. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे Account circle आणि त्यानंतरसेटिंग्ज आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
    • तुम्ही मार्गाचे अवलोकन स्क्रीनवरील निळ्या बिंदूवरदेखील टॅप करू शकता. 
  2. एका नजरेत दिसणारे दिशानिर्देश वर टॅप करा.

अधिक जाणून घ्या

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16601566683382482699
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false