Google Maps मधील समुदाय फीड एक्सप्लोर करणे

तुम्ही Google Maps मधील समुदाय फीडच्या मदतीने आजूबाजूचे परिसर, शहरे किंवा राज्ये यांसारख्या जवळपासच्या ठिकाणांबद्दल पर्सनलाइझ केलेल्या सूचना आणि अपडेट मिळवू शकता. समुदाय फीडमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • इतर Maps वापरकर्ते, व्यवसाय आणि बातम्यांच्या स्थानिक ऑनलाइन साइट यांसारखे तृतीय पक्ष यांच्याकडील अपडेट
  • तुम्ही फॉलो करत असलेल्या लोकांच्या पोस्ट
  • तुमची प्राधान्ये आणि मागील अ‍ॅक्टिव्हिटी यांच्या आधारावर पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी

समुदाय फीड पाहण्यासाठीच्या तुमच्या पर्यायांमध्ये पुढील मार्गांचा समावेश आहे:

  • “एक्सप्लोर करा” टॅबमध्ये, प्लेसशीटवर वरती स्‍वाइप करा.
  • शहर किंवा इतर ठिकाण शोधा आणि प्लेसशीटवर वरती स्‍वाइप करा.

टीप: तुम्ही एखादी व्यवसाय प्रोफाइल व्यवस्थापित करत असल्यास आणि समुदाय फीडमध्ये पोस्ट करायचे असल्यास, व्यवसाय म्हणून कसे पोस्ट करावे ते जाणून घ्या.

महत्त्वाचे: आशय हा आमची आशय धोरणे किंवा लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे आम्हाला आढळल्यास, Google तो काढून टाकू शकते. शिफारशींवर इतर कंपन्यांच्या पेमेंटचा परिणाम होत नाही. Google Maps मधील सशुल्क आशयाला लेबल लावले जाते.

एक्सप्लोर करा या टॅबवरील फीड वापरा

तुमच्या फीडमधील आशय हा तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी व नकाशावरील सध्याचा भाग यांनुसार पर्सनलाइझ आणि रँक केला जातो. तुम्ही नकाशावरील भाग हलवल्यामुळे तुमच्या स्क्रीनवरील जवळपासची ठिकाणे आपोआप रीलोड केली जातात. पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी बंद करण्यासाठी, तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग्ज अपडेट करा.
 
तुमचे फीड कसे पर्सनलाइझ करावे याविषयी अधिक जाणून घ्या.

तुमच्या फीडमधील त्यांच्या वैयक्तिक कार्डवर तुम्ही व्यवसाय लाइक करू शकता, शेअर करू शकता, फॉलो करू शकता किंवा त्यांना मेसेज करू शकता. एखाद्याला फॉलो करण्यासाठी आणि त्यांच्याकडून अपडेट मिळवण्यासाठी, त्यांच्या प्रोफाइलच्या नावाच्या बाजूला फॉलो करा वर टॅप करा.

तुम्ही एक्सप्लोर करा या टॅबमधून तुमच्या स्वतःच्या पोस्टदेखील थेट जोडू शकता. तुम्ही एखाद्या ठिकाणाविषयी जोडलेले फोटो किंवा परीक्षणे इतर लोकांच्या एक्सप्लोर करा या टॅबमध्ये शिफारस केली जाऊ शकतात. तुमच्या फॉलोअरनादेखील तुमचा आशय त्यांच्या टॅबमध्ये दिसू शकतो. तुमची Maps प्रोफाइल कशी व्यवस्थापित करावी याविषयी अधिक जाणून घ्या.

टीप: फीड लहान करण्यासाठी, खाली स्‍वाइप करा.

तुम्ही ठिकाणे शोधता, तेव्हा समुदाय फीड एक्सप्लोर करा

समुदाय फीड पाहण्यासाठी आजूबाजूचा परिसर, शहर किंवा राज्य यासारखे एखादे ठिकाण शोधा आणि प्लेसशीटवर वरती स्‍वाइप करा. आमचे स्थानिक मार्गदर्शक यांनी शेअर केलेल्या भागांचे अलीकडील फोटो आणि परीक्षणे तुम्ही पाहू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6950262909386034041
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false