शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक हेतूंसाठीच्या अपवादांबद्दल जाणून घेणे

Google Drive, Docs, Sheets, Slides, Forms आणि Sites या गोष्टी लोकांना आशय तयार करण्यात मदत करण्यासाठी व एकमेकांसोबत सहयोग करण्याकरिता डिझाइन केल्या आहेत. 

गैरवर्तनाशी संबंधित प्रोग्राम धोरणे ही Google उत्पादने वापरणाऱ्या प्रत्येकासाठी सकारात्मक अनुभव कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 

आशय हा आमच्या धोरणांचे उल्लंघन करत असल्याचे आम्ही कंफर्म केल्यावर त्या धोरणांची अंमलबजावणी करतो. याचा अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतो:

  • आशयाचा अ‍ॅक्सेस प्रतिबंधित करणे 
  • आशय काढून टाकणे
  • गंभीर उल्लंघनांसाठी वापरकर्त्याचा Google उत्पादनांचा अ‍ॅक्सेस मर्यादित करणे किंवा समाप्त करणे  

आम्ही शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक (EDSA) आशयासाठी या धोरणांमध्‍ये अपवाद करू शकतो.

आशय EDSA म्हणून पात्र आहे का याचे मूल्यांकन करणे

तुमचा आशय EDSA संदर्भातील अपवादासाठी पात्र आहे का हे निर्धारित करताना, आम्ही संदर्भ आणि संकेताच्या हेतूचे मूल्यांकन करतो. 

ESDA संदर्भातील अपवाद योग्य आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही "५ डब्लू आणि १ एच" - हू, व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय, हाऊ - हे फ्रेमवर्क वापरून आशयाचे मूल्यांकन करू शकतो. 

उल्लंघन करणाऱ्या आशयाच्या बाजूने वेगळ्या प्रकारे मुद्दा मांडून किंवा प्रतिवाद करूनदेखील आशय हा EDSA स्वरूपाचा असल्याचे सिद्ध केले जाऊ शकते. 

आशय हा EDSA संदर्भातील अपवादाच्या अधीन असावा की नाही हे निर्धारित करण्यासाठी खुद्द आशयाच्या व्यतिरिक्त इतर बरेच घटक वापरले जातात, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 

  • फाइल किंवा फोल्डरचे शीर्षक
  • संपादकीय वॉटरमार्क
  • आशय किती सहजरीत्या अ‍ॅक्सेस केलेला आहे 
    • लिंक वापरून कोणालाही अ‍ॅक्सेस करता येतील अशा दस्तऐवजांच्या समावेशासह, खूप लोकांसोबत शेअर केलेला आशय हा कदाचित मालकाचे हेतू असलेल्या संदर्भाच्या बाहेर वापरला जाऊ शकतो. 

तथापि, आशयामध्ये फक्त EDSA ची वैशिष्ट्ये असल्यामुळे, जसे की तो ब्रॉडकास्ट सेगमेंटच्या किंवा शैक्षणिक स्वरूपातील पेपरच्या शैलीत दाखवून, तो EDSA म्हणून ग्राह्य धरला जाईल याची हमी देता येत नाही. 

महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की सर्व धोरणे EDSA संदर्भातील अपवादाला अनुमती देत नाहीत. पुढील गोष्टींसाठी EDSA संदर्भातील अपवाद लागू होत नाहीत:

  • खाते हायजॅक करणे
  • खाते इनॅक्टिव्ह असणे
  • उल्लंघन
  • लहान मुलांसोबतचे लैंगिक गैरवर्तन आणि शोषण
  • मालवेअर आणि त्यासारखा दुर्भावनापूर्ण आशय
  • विनासंमती तयार झालेली लैंगिकदृष्ट्या भडक इमेजरी
  • फिशिंग
  • स्पॅम
  • सिस्टीममधील हस्तक्षेप आणि गैरवापर

EDSA संबंधित मूल्यांकनांची उदाहरणे

खालील सारणीमध्ये काल्पनिक आशय आणि तो EDSA संदर्भातील अपवाद मानला जाण्याची शक्यता दाखवली असून, तो आशय अन्यथा धोरणाची उल्लंघने म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो. 

धोरण

EDSA संदर्भातील अपवादाची शक्यता

EDSA संदर्भातील संभाव्य अपवाद

हिंसा आणि रक्तपात

अधिक शक्यता

अशा लोकांचा फोटो ज्यांच्या बॉम्बस्फोटामुळे झालेल्या इजा दिसत आहेत आणि वेळ व ठिकाणासह त्याला फोटोमध्ये स्पष्टपणे नाव दिले आहे. माहितीपर

धोकादायक आणि बेकायदेशीर: स्वतःला हानी पोहोचवणे

अधिक शक्यता

स्वतःला हानी पोहोचवण्याचे वैयक्तिक प्रयत्न शेअर करणारा, पण असे वर्तन प्रमोट न करणारा दस्तऐवज. माहितीपर

धोकादायक आणि बेकायदेशीर: धोकादायक साहित्य

अधिक शक्यता

विस्फोटकांबद्दल माहिती करून देणारे रसायनशास्त्राचे पाठ्यपुस्तक. शिक्षण 

द्वेषयुक्त भाषण

अधिक शक्यता

द्वेषपूर्ण गटाच्या मोर्च्याचा असा व्हिडिओ ज्यामध्ये बातमीसंबंधित अधिकृत संस्थेचा वॉटरमार्क असून ठिकाणाचे वर्णनात्मक शीर्षक, तसेच मोर्चा झाल्याची तारीख दिलेली आहे. माहितीपर

लैंगिकदृष्ट्या भडक आशय

अधिक शक्यता

लक्षवेधी नग्नतेच्या शैलीमध्ये दाखवलेले संगमरवरी ग्रीक पुतळ्यांचे फोटो. कलात्मक 

 

Google Drive, Docs, Sheets आणि Slides मधील गोपनीयता व सुरक्षा 

तुम्ही Google Drive, Docs, Sheets, आणि Slides वर सेव्ह केलेला आशय हा तुम्ही शेअर करणे निवडत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी खाजगी असतो. काही कोलॅबोरेटरसोबत शेअर करण्यापासून ते फाइलला सार्वजनिकरीत्या अ‍ॅक्सेस करून देण्यापर्यंत तुम्ही अनेक मार्गांनी फाइल शेअर करू शकता. 

कृपया लक्षात घ्या, की लिंक असलेल्या कोणालाही फाइल उपलब्ध असतात, तेव्हा तुमचा जो उद्देश किंवा हेतू आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कारणासाठी आशय वापरला जाऊ शकतो अथवा त्याचा अर्थ लावला जाऊ शकतो. 

महत्त्वाचे: विशेषतः इतरांसोबत शेअर करताना, तुमच्या आशयाला नेहमी काळजीपूर्वक लेबल केला असल्याची आणि त्याला संदर्भ दिला असल्याची खात्री करा. कोणत्याही वेळेला, तुम्ही शेअरिंग थांबवणे, मर्यादित करणे किंवा बदलणे हे करू शकता.

उल्लंघनांची तक्रार कशी करावी आणि आवाहन कसे करावे

तुमची फाइल Google च्या सेवा अटी किंवा प्रोग्रामशी संबंधित धोरणांचे उल्लंघन करत असल्याची तुम्हाला सूचना मिळाल्यास आणि हे चुकून झाले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आवाहनाची विनंती करू शकता. उल्लंघनाच्या परीक्षणाची विनंती करणे.

आमच्या धोरणांचे उल्लंघन करत आहे असे दिसत असणाऱ्या आशयाचे पुनरावलोकन करण्याचीदेखील तुम्ही विनंती करू शकता.


 
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12681914237165025498
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false